Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2154 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि.26 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यातील एक रहिवासीचा कोरोना तपासणी अहवाल इतर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळून आला आहे तसेच कोणीही कोरोनामुक्त न झाल्याने जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सात तर जिल्ह्याबाहेर एक अशी आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 216 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी इतर शहरातील एक रूग्ण पॉझिटिव्ह असून उर्वरित 215 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72791 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70997 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 96 हजार 871 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 24 हजार 40 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.45 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.46 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2154 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 20 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2154 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 17 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 770 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 752 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

_____________________________________

कारगील विजयातून देशासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा घ्यावी

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

यवतमाळ दि.26 जुलै : सैनिकांच्या शौर्यगाथेतून आपल्याला देशसेवा करण्याची प्रेरणा मिळते, त्यांनी देशासाठी केलेल्या समर्पणाला माझा सलाम आहे. दरवर्षी २६ जुलै रोजी साजरा करण्यात येणारा कारगील विजय दिवस हा देशभक्ती व बलीदानातून स्फुर्ती घेण्याचा दिवस आहे, तरी यातून सर्वांनी आपआल्या पदावर देशासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा घ्यावी, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज व्यक्त केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे आज २२ व्या कारगिल विजय दिवसाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवावी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

धाडस असल्याशिवाय कोणतेही युद्ध किंवा आपत्तीमध्ये लढल्या जात नाही, ते धाडस भारतीय सैनिकात आहे, देशभक्तीसाठी सैनिक उमेदीच्या काळात कुटूंबापासून दूर राहून मोठा त्याग करतात. त्यांचे गुण आपण आत्मसात करावे व सैनिकांचा मानसन्मान करावा असे निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी सांगितले.

कारगील युद्धात प्रत्यक्ष सहभागी असणारे माजी सैनिक सार्जंट विवेक पांडे यांनी कारगील युद्धाची माहिती सांगितली. भारतीय हवाई दलाने इतक्या उंचावर व जीवाची जोखीम पत्कारून कारगील युद्ध लढले, अशा प्रकारचे युद्ध अद्याप जगाच्या इतिहातसात कुठेही लढल्या गेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी यांचे हस्ते वीरपत्नी राधाबाई रामकृष्ण बोरीकर, मंगला देवचंद्र सोनवने, नंदाबाई दादाराव पुराम, सुनिता प्रकाश विहिरे, अंजनाबाई तायडे, विरमाता लक्ष्मीबाई थोरात यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. तसेच उमरखेड येथे सत्वशीला साहेबराव काळे, वणी येथे स्नेहा विकास कुळमेथे, दारव्हा येथे अलकनंदा पुजाजी सरोदे व अंजनाबाई देवीदास तायडे यांचाही संबंधीत तहसिलदार यांनी सत्कार करण्यात आला. सुरवातीला दोन मिनिटांचे मौन पाळून सैन्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन व आभार माजी सैनिक बालाजी शेंडगे यांनी केले.

कार्यक्रमाला माजी सैनिक संघटनाचे पदाधिकारी, वीरनारी, वीरमाता, जिल्ह्यातील माजी सैनिक सर्वश्री लखाने, पांडे, भोरे, गावंडे, क्षीरसारगर, तामगाडगे, गिरी, मस्के व राजकुमार उरकुडे इ. उपस्थित होते.

_____________________________________

दुसरा डोजसाठी पात्र नागरिकांनी तत्परतेने लस घ्यावी

-जिल्हाधिकारी

सहा आठवड्याचे बालकांना न्युमोकोकल लस देण्यासाठी जनजागृती करावी

यवतमाळ दि.26 जुलै : जिल्ह्यात सर्व लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सीन व कोविशील्ड या दोन्ही लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून पहिला डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सीन लसच्या दुसऱ्या डोजसाठी 28 दिवसानंतर तर कोविशिल्ड लसच्या दुसऱ्या डोससाठी 84 दिवस पुर्ण झाल्यानंतर संबंधीतांनी आपला दुसरा डोस तत्परतेने घ्यावा, असे आहवान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांनी आज आरोग्य विभागाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, वसंराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. रमा बाजोरिया प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की जिल्ह्यात न्युमोकोकल लस देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. कुपोषित बालक जन्माला आल्यावर न्युमोकोकल बॅक्टेरीयामुळे अनेक नवजात बालके दगावण्याचा धोका असतो, त्यामुळे सहा आठवड्याचे बालकांना पी.सी.व्ही. न्युमोकोकल कॉन्ज्युगेटेड व्हॅक्सीन देण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोरोना संभाव्य तीसऱ्या लाट पुर्वतयारीचाही आढावा घेतला. व्हेटीलेटर, ऑक्सीजन बेड, सर्वसाधारण बेड, पीएसए प्लांट, ऑक्सीजनची संभाव्य गरज व उपलब्धता, विद्युत जनरेटर, अग्नीरोधक यंत्रणा तसेच गरजेनुसार आरोग्य सेवेतील पदभरती इ. बाबीच्या नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला व प्रशासकीय मान्यता दिलेल्या व निधी उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सेवेच्या बाबी विहित मुदतीत उपलब्ध करण्याचे सांगितले.

बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Copyright ©