विदर्भ सामाजिक

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कडून किनवट मध्ये विविध कार्यक्रम संपन्न

——————————————

भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवस निमीत्त किनवट येथे दिनांक 26 रोजी सकाळी 11.00 वा. आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रतिक केराम व तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण व गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
सध्या भारतामध्ये कोरोना प्रमाण कमी झाले नाही या व इतर सामाजिक बाबीला अनुषंघुन यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने पंकजा मुंडे यांचा वाढदिवस किनवट साजरा करण्यात आला. यामध्ये विविध प्रकारच्या वृक्ष लावण्यात आले . तर किनवट येथील गोकुंदा स्थित उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ओबीसी जिल्हा अध्यक्ष बाबूराव केंद्रे अ. जमाती जिल्हाध्यक्ष गोविंदा अंकुरवाड, भाजपा अ .जमाती मोर्चा चे नांदेड जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष , जितेंद्र अ .कुलसंगे , दत्तभाऊ आड़े, पस उपसभापती कपिल करेवाड , तालुका समन्वयक बाळकृष्ण कदम, संतोष मरसकोल्हे, नगरसेवक शिवाजी आंधळे, नरेंद्र सिरमनवार, विवेक केंद्रे, लक्ष्मन मुंजे, संतोष कन्नाके ,इंद्रदिप वाघमारे, नरसिंग तक्कलवार, आकाश भंडारे, राजू दराडे आदी उपस्थित होते.

Copyright ©