Breaking News यवतमाळ सामाजिक

नगरपालिका प्रशासनाचा कारभार भारी, पाणीपुरवठा ची महत्वाची पाईपलाईन फुटून सुध्दा दुरुस्तीची घेत नाही अधिकारी जवाबदारी

 

नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या राहत्या घराजवळच  झाली पाईपलाईन लिकेज

 

दिग्रस शहरातील 80 टक्के भागात होत असलेला पाणीपुरवठा हा अरुणावती धरणावरून होत आहे. जलशुद्धीकरण  करूनच जुन्या चिंचोली परिसरातून हे पाणी पुरवठा होत आहे . मात्र पाणी पुरवठा होत असलेल्या पाईप लाईन मध्ये शहराच्या मध्य भागी असलेल्या टाकीच्या खालोखाल खूप मोठा लीकेज असून, गडुळ व दुर्गंधीयुक्त पाणी दिग्रस परिसरात पुरवठा होत आहे. याविषयी अनेक तक्रारी येऊन सुध्दा पालिका प्रशासन या गंभीर विषयी सतर्कता बाळगतांना दिसून येत नाही.लिकेज असलेल्या  परिसरात घाणीचे साम्राज्य आहे

याच परिसरात नगर परिषद प्रशासनाने पाण्यासारखा पैसा वाहून स्वच्छतेचे धडे दिले आहे मात्र नगरपरिषद कडून कुठल्याही विषयावर आमल होताना दिसून येत नाही.विशेष बाब म्हणजे या परिसरातच नगरपरिषद चे मुख्याधिकारी वास्तव्यास आहेत मात्र इतका गंभीर विषय त्यांच्या नजरेस न पडावा…या विषयाने नागरिकांत कमालीची चर्चा रंगली आहे .मुख्याधिकारी यांच्या राहत्या घराजवळ मेन पाईप लाईन लिकेज असून सुद्धा मुख्य अधिकाऱ्यांचे  या विषयावर लक्ष नाही असे कसे होउ  शकते  अशी सुद्धा चर्चा नागरिकांतून होत आहे.नगर परिषद च्या मुख्याधिकारी यांच्या घराजवळील पाईप लाईन दुरुस्त होत नसेल तर सर्व सामान्य जानते चे काय हाल होत असतील याची जाणीव कोणी करावी हा संशोधनाचा विषय झाला आहे. नगर परिषद च्या मेन पाईपलाईन ची ही दशा असेल तर नगरातील छोट्यामोठ्या पाईपलाईन विषयी पालिका प्रशासन किती जागृत असेल नागरिकांतून असा प्रश्न केल्या जात आहे.

——————————————————-

पत्रकार शक्ती च्या प्रतिनिधीने  या विषयी पाणी पुरवठा अभियंता (न.प.दिग्रस) यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयी स्पष्ट सांगितले आहे की ही पाईपलाईन खूप जुनी आहे व या पाईपलाईन ला जंग लागल्या मुळे वेल्डिंग सुद्धा होऊ शकत नाही व ही पाईपलाईन वरंवार लिकेज होतच असते हा काही इतका गंभीर विषय नाही पाणी पुरवठा तर होत आहे ना..!

 

Copyright ©