Breaking News यवतमाळ सामाजिक

आज्ञात बंदूकधारीचा युवकावर तुफान गोळीबार हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू

येथे वर्दळ असलेल्या वाशिम रस्त्यावर अज्ञात दोन युवकांनी एकास भरदिवसा तुफान गोळ्या घालून जागीच ठार केल्याची घटना दि.25 जुलै 2021 च्या दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली आहे. वसंत नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी एकच गर्दी झाली होती.
गोळीबाराच्या घटनेमध्ये इम्तियाज खान सरदार खान वय 28 रा. अरूण ले आऊट असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाशिम रोड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीम यांच्या घराजवळ असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये इम्तियाज खान सरदार खान या युवकाच्या मालकीचे एस.आर.कार एसी रिपेरिंग सेंटर आहे. येथील कार रिपेरिंग सेंटर मध्ये नेहमीप्रमाणे इम्तियाज खान हा दुकान उघडून काम करीत होता. दुपारी 1 वाजताच्या दरम्यान छत्रपती शिवाजी चौकातून वाशिमरोड लगत असलेल्या दुकानाकडे ठार मारण्याच्या उद्देशाने दोन बंदूकधारी व्यक्ती मोटर सायकल या दुचाकीने दुपारी 1 वाजताच्या दरम्यान आले. त्यानंतर त्या दोन अज्ञात व्यक्तीने दुचाकी उभी करून अंधाधून फायरींग करण्यास सुरुवात केली. फायरिंग होताच इम्तियाज खान त्याच्या दुकानातून हॉटेल जमजमकडे धावत सुटला.इम्तियाज खान धावत असताना त्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार सुरूच ठेवला. प्रत्यक्षदर्शींच्या चर्चेत गोळीबार ने इम्तियाज खान याच्यवर गोळीबार झाल्याने जागीच मृत्यू झाला. त्या दोन अज्ञात बंदूकधारी व्यक्तींनी जवळपास पाच ते सहा राऊंड फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अज्ञात बंदूकधारीकडून गोळ्या झाडून आणलेली दुचाकी घेऊन पसार झाले होते. इम्तियाज खान या युवकाला प्रत्यक्षदर्शीनी एका ऑटोमध्ये टाकून खाजगी दवाखाना मध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. उपस्थित डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याने त्याचे शव येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करण्याकरिता आणले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली असता बघणार्‍यांची एकच गर्दी उसळली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वसंतनगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच वसंत नगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, शहर पोलीस थानेदारदिनेचंद्र शुक्ला आपल्या पोलिस ताफ्या सह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. दरम्यानच्या वेळेला परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती त्यामुळे वाहतूक शाखेचा ला पाचारण करण्यात आले व रस्ता मोकळा केला होता घटनेच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त कायम होता. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. एकंदरीत पुसद शहरामध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे दहशतीचे वातावरण पसरले असून त्या दोन अज्ञाताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Copyright ©