यवतमाळ सामाजिक

यवतमाळ श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत राऊत तर सचिव सुरेंद्र राऊत अविरोध.

 

यवतमाळ : यवतमाळ श्रमिक पत्रकार संघाची आमसभा रविवारी 25 जुलैला पार पडली यात नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून कार्यकारिणीत झी 24 तास चे जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांची अध्यक्षपदी तर लोकमतचे उपसंपादक सुरेंद्र राऊत यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सचिव विवेक गावंडे यांनी नवनियुक्त कार्यकारिणीतील इतर सदस्यांच्या नावाची घोषणा केली.

यवतमाळ श्रमिक पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार स्व. प्रदीप येलमे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आमसभेसाठी मंचावर जेष्ठ पत्रकार दिनेश चोरडिया, अनिरुद्ध पांडे, गणेश बयस, रघुवीरसिंह चव्हाण, संघाचे राज्य कार्यकारणी सचिव नागेश गोरख व गणेश राऊत तसेच मावळते सचिव विवेक गावंडे उपस्थित होते. पत्रकार संघ कार्यकारिणी निवडणूक प्रक्रियेत सर्वानुमते पदाधिकारी निवडल्या गेले, यामध्ये अध्यक्षपदी श्रीकांत राऊत ( झी 24 तास जिल्हा प्रतिनिधी), सचिवपदी सुरेंद्र राऊत (दै.लोकमत उपसंपादक), उपाध्यक्ष गणेश खडसे (दै.देशोन्नती), उपाध्यक्ष अंकुश वाकडे (दै. नवभारत), उपाध्यक्ष मयूर वानखडे (दै. दिव्य मराठी), सहसचिव विवेक गावंडे (टी व्ही 9), संघटन सचिव शाकीर अहमद, नीलेश फाळके (ईटीव्ही भारत), कोषाध्यक्ष भास्कर मेहरे (आयबीएन लोकमत) प्रसिद्धीप्रमुख घनश्याम वाढई, तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सुकांत वंजारी, मनीष जामदळ, संजय सावरकर, उल्हास निनावे, रूपेश उत्तरवार, मकसूद अली, युवराज पाटील, समीर मगरे, उज्वल सोनटक्के, जयंत राठोड, मयुर शर्मा, चेतन देशमुख, टीशा शर्मा आदींची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय श्रमिक पत्रकार संघटनेचे कामकाज सुरळीत व ज्येष्ठ पत्रकार यांच्या मार्गदर्शनात चालावे याकरिता सुकाणू समिती जेष्ठ पत्रकार रघुवीरसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेत गठित करण्यात आली आहे. समितीत दिनेश चोरडीया, गणेश बयस, वीरेंद्र चौबे, अविनाश साबापुरे, नागेश गोरख, गणेश राऊत, विजय बुंदेला सदस्यपदी असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राज्य सचिव नागेश गोरख, गणेश बयस यांनी कामकाज पाहिले. यावेळी यवतमाळ जिल्हा कार्यालयातील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तथा यवतमाळ श्रमिक पत्रकार संघाचे नोंदणीकृत सदस्य उपस्थित होते.

Copyright ©