यवतमाळ सामाजिक

सहकार क्षेत्रातील नामवंत “दीपस्तंभ पुरस्कारा” ने गोदावरी अर्बन सन्मानित

 

राज्यातील पतसंस्थाच्या चळवळीत नाविन्यपूर्ण,भरीव व बहुमोल कामगिरी सोबतच दिशादर्शक कार्य केल्याबद्दल.महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असलेला राज्यस्तरीय प्रथम “दीपस्तंभ पुरस्कारा”ने गोदावरी अर्बनला सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार सोहळ्याचे वितरण सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिर,शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते.यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,कार्याध्यक्ष राजुदास जाधव, मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या शुभहस्ते गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर,मुख्यालयाचे मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे,
वरिष्ठ शाखा व्यवस्थापक रवि इंगळे , अधीक्षक विजय शिरमेवार,विपणन शाखा व्यवस्थापक महेश केंद्रे ,सर्वश्री शाखा व्यवस्थापक भारत राठोड,अमित पिंपरकर,धनंजय क्षिरसागर,राहूल कोल्हे,अविनाश बोचरे,अंकुश बिबेकर,फकिरा जाधव यांना देण्यात आला.

सहकार क्षेत्रात गोदावरी अर्बनने अवघ्या नऊ वर्षात अनेक विक्रम मोडीत काढले असून सध्या ते स्वतःचेच विक्रम नव्याने तयार करीत आहे.राज्याच्या अर्थक्षेत्रात आपल्या कार्यशैलीने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.बचतगट चळवळ ते मल्टीस्टेट विस्तार असा उतुंग प्रवास असून कार्यक्षेत्र महाराष्ट्र,
आंध्रप्रदेश,तेलंगाणा,कर्नाटक व गुजरात या पाच राज्यात आहे.संस्थेच्या संपूर्ण शाखा ह्या संगणिकृत आहेत व सर्व कर्मचारी उच्चविद्याविभूषित असून त्यांना वेळोवेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,,सहकार क्षेत्रातील विविध कायदे,ग्राहकांचे संगोपन,संवर्धन व व्यवसाय वृद्धी आशा अनेक विषयांवर त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीद्वारे प्रशिक्षण दिले जाते.संस्थेच्या या विविध कार्यप्रणालीचा अत्यंत बारकाईने अभ्यास करीत राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यस्तरीय प्रथम दीपस्तंभ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांनी संचालक,कर्मचारी,दैनिक आवृतठेव प्रतिनिधी,सभासद,ठेवीदार यांचे पुरस्कार मिळाल्या बद्दल अभिनंदन करीत आपल्या ग्राहकांचे आणि फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Copyright ©