यवतमाळ सामाजिक

हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड लसीत होतेय गैरप्रकार

——————————————–
यवतमाळ- कोरोना संकटाला हद्दपार करण्यासाठी शासन स्तरावरून नानाविध उपाय योजना आखल्या जात असून त्यातलाच एक भाग म्हणून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मात्र हिवरी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात या मोहिमेला गंभीरतेने न घेता या लसित मनमानी कारभार चालवित लस उपलब्ध असतानाही नागरिकांना परत करून बाहेरून आलेल्या परिचयातील लोकांना लस देवून बाकीचे लस फेकून दिल्याची गंभीर बाब शुक्रवारला येथे घडल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक २३ शुक्रवारला या आरोग्य केंद्रात दहा वायल आणण्यात आले होते. प्रत्येक वायल फोडताना त्यामध्ये जेवढ्या लसी असतात तेवढे लाभार्थी तिथे असणे आवश्यक आहे.परिचारिकांच्या मते एका व्हॉयल मध्ये अकरा डोजेस होतात त्यानुसार 110 लाभार्थ्यास याचा लाभ मिळायला पाहिजे,तीन डोजेश दिल्यावर इतर आठ लस निकामी होवू शकते. शुक्रवार ला पाच वाजता लसीकरण बंद करण्यात आले असता सायंकाळी सहा वाजे दरम्यान यवतमाळ येथिल येथिल कर्मचाऱ्याच्या मर्जीतील तिन लाभार्थी चार चाकी व्यागणार या वाहनाने आले. तेव्हा मात्र वायल मधील उपलब्ध लसी चा विचार न करता त्यांना लस देण्यात आली. मग उर्वरित लसीचे काय करण्यात आले. हा एक संशोधनाचा विषय बनला असून उर्वरित लस फेकून दिल्याची खमंग चर्चा रंगली आहे. प्रथमतःच या लसीचा एवढा तुटवडा चालू असून नागरिक या लसीसाठी तडफडत आहे. मात्र येथिल लसीकरण करणारे कर्मचारी यांना या लसीची कोणतीही गंभीरता का नसावी हे नागरिक विचार करीत आहे. एका वायल मधून तिन लाभार्थ्याला लस दिल्या नंतर ईतर लसीचा काय केले असावे. त्यांनी या लसिबद्दल रेकॉर्ड वर काय नोंद केली असावी. या गंभीर बाबीची जिल्हाधिकारी साहेबांनी चौकशी लावून या आरोग्य केंद्रातील लसीचा लेखा जोगा घ्यावा व यातील दोषी आरोग्य कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्र परीसरातील नागरिक करीत आहे.

Copyright ©