यवतमाळ सामाजिक

मसोद गावतील मुख्य रस्ता केव्हा होणार मसोदवसियांचा प्रशासनाला सवाल

 

तालुक्याला लागुन असलेले मासोद जंगल व्याप्त भागात वसलेले गाव आहे गावातिल मुख्य रस्ता मसोद गाव 1985ला पुनर्वसन झाले त्या वेळी बनला होता तेव्हा पासून आज पर्यंत यावर डांबराचा थेंब ही पडला नाही
पूर्ण रस्त्याची चाळण झाली असुन रस्त्याला पानंधिच स्वरुप आलेल आहे. पावसाळ्यात
वाहण तर सोडाच पाइ चालताना तोल जाऊन पडतो कि काय अशी मनात
भिती निर्मान होत असते. मसोदमधिल मुख्य रस्त्याकडे सर्व पक्षातील नेत्यांचे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.काँग्रेस, भाजप, पक्षाच्या
आमदार दोन.. दोन तिन.. तिन फेर निवडुण आलेत आमदार गावात आल्यावर रस्ता बनविण्याचे तोंड भरुन आश्वासनही देन्यात आले.अनेक मोट्या नेत्यांन कडून काही दिवसांनी अनुदानाला मंजुरिही देण्यात आली व
रस्त्याची मोजमाप ही करण्यात आले मात्र मग कुठे माशी शिंकली देव जाणे पुढे कोणतीही
क्रिया होत नसुन या जन्मात तरी चांगला रस्ता पहायला मिळेल काय ?
असे मसोद वासी व्यक्त करित आहे. रस्ता न झाल्या मुळे गावकर्यात मोठा असंतोष
निर्मान झाला आहे.गेल्या अनेक वर्षापासून हा रास्ता तयार होण्याची प्रतिक्षा गावतील नागरिक करीत आहे परंतू केवा या मार्गाचे काम होइल असा प्रष्न गावकरी विचारत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©