विदर्भ सामाजिक

नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे डेंगूचे रुग्ण आढळले

नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे शहरांमध्ये डेंगू दासा चा प्रादुर्भाव होऊन अनेक डेंग्यूचे रुग्ण शहरामध्ये आढळत आहे .या रुग्णांमध्ये लहान बालकांचा जास्त समावेश असल्याचेही समजते मी वडार महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष शेखर चिंचोळकर यांच्या दोन्ही मुलांना डेंग्यूच्या आजाराने ग्रासले असून ते उपचारासाठी तेलंगणा येथे रुग्णालयात गेले आहे .नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाने शहरातील या गंभीर समस्या कडे लक्ष न दिल्यास आंदोलन छेडू असा कडक इशारा मी वडार महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष चिंचोळकर यांनी दिला आहे .
सविस्तर वृत्त असे की नगरपालिका प्रशासनास कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने माहूर नगरपंचायत येथील मुख्याधिकाऱ्यांकडे येथील न पा चा कारोबार सोपवला आहे . प्रभारी मुख्याधिकारी हे उंटावरून शेळ्या हाकत असल्याकारणाने यांचे किनवट ची काही घेणे देणे नसल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे . प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची भेट नागरिकांना दुर्मिळ होत असून अनेक कामे ही नागरिकांची खोळंबल्या जात आहे .भ्रमणध्वनीद्वारे मुख्यधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास ते फोन उचलत नसल्याची ही तक्रार अनेक नागरिकांमधून होत आहे .
शहरांमधील संपूर्ण नाल्या पावसाळ्यापूर्वीच स्वच्छ करणे गरजेचे असतानाही झोपेत असलेले नपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे .शिवाय फॉगिंग मशीन द्वारे संपूर्ण शहरांमध्ये डेंगु व इतर आजाराचा प्रसार न व्हावा याकरिता फवारणी करणे अत्यंत जरुरी असतानाही प्रभारी मुख्याधिकारी हे माहूर वरून आपला कारभार चालवत असल्याने याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे .संपूर्ण शहरात नाल्यांमध्ये जागोजागी पाणी साचून असल्याकारणाने मच्छरांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला आहे . यामध्ये शहरांमध्ये डेंगू चे आजार वाढले आहे याला केवळ न पा प्रशासनच जिमेदार असल्याचे चर्चिले जात आहे .कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने येथील कोणत्याही कर्मचाऱ्यांवर नाही प्रतिनिधीची नाही कोणते अधिकाऱ्यांची छाप न राहिल्याने सर्व कामात दिरंगाई झाल्याचे निदर्शनास येत आहे .
शहरात डेंग्यूची साथ केवळ मच्छरामुळेच चालू झाली असून रुग्णांमध्ये लहान बालकांचा अधिक समावेश असल्याचेही चर्चा आहे आरोग्य विभाग नपा प्रशासनाने शहरात तात्काळ फवारणी करणे गरजेचे आहे .
मी वडार महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष शेखर चिंचोळकर यांच्या दोन्ही मुलांना डेंगू आजाराने ग्रासले असून मुलांची तब्येत गंभीर असल्याने त्यांना तात्काळ तेलंगाना ने येथील रुग्णालयात उपचाराकरता नावे लागले शहरांमध्ये न .पा. प्रशासन व आरोग्य विभागाने तात्काळ फवारणी न केल्यास यांच्याविरोधात आंदोलन छेडू असा कडक इशाराही यावेळी यांनी दिला आहे .

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©