Breaking News यवतमाळ सामाजिक

भरदिवसा गजबजलेल्या चौकात विना नंबर च्या ट्रॅक्टरने भरधाव वेगात येऊन वयोवृद्ध व्यक्तीला जबर धडक देऊन केले घायाळ ,अपघात करून ट्रॅक्टर फरार

ट्रॅक्टर चालकाकडे वाहन चालविन्याचा परवाना नसल्याचे नागरिकात चर्चा

आज दिनांक २०/०७/२०२१ ला सकाळी अंदाजे ११ वाजता च्या दरम्यान.दिग्रस पोलीस स्टेशनच्या  हाकेच्या अंतरावरील असलेल्या जुन्या पेट्रोल पंप चौकामध्ये भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरने वयोवृद्ध स्कुटी चालक व्यक्तीस मागून येऊन जबर धडक दिली.धडक इतकी भयंकर होती की त्या धडकेने वाहना सह वयोवृद्ध व्यक्ती ट्रॅक्टर च्या पुढील भागामध्ये अडकून अंदाजे ६ ते ७ फूट घासतगेले. ट्रॅक्टरने वयोवृद्ध स्कुटी चालकास जबर धडक दिली तेव्हा खूप मोठा आवाज गुंजला होता व या अपघातात ट्रॅक्टरच्या समोरील भागात स्कूटी वाहन व त्या वाहनाखाली वयोवृद्ध व्यक्ती रक्ताच्या सड्यात घासत गेले  त्यांचा पाय स्कूटी खाली दबल्याने मोठी इजा दिसून येत होती.भयंकर अपघात करून सुद्धा ट्रॅक्टरचालकच मग्रूरतेने उलट त्या वयोवृद्ध व्यक्तीवरच चिडत होता इतका भयंकर अपघात होऊन सुध्दा ट्रॅक्टर चालकाच्या चेहर्यावर जरा सुध्दा घटनेचे गांभीर्य दिसून येत नव्हते. अपघातातील जखमी व्यक्तीला नागरिकांनी दवाखान्यात दाखल करून जखमीव्यक्ती च्या नातेवाईकांना कळवले.या अपघाती ट्रॅक्टरवर कुठलेही नाव नंबर नसल्याने अपघातातील जखमी व्यक्तीच्या नातेवाईकांनि पोलीस स्टेशन ला तक्रार देण्याचे टाळले असावे नागरिकांतून अशी चर्चा  होत आहे. सदर ट्रॅक्टर विना नंबर व अवैध गौण खनिज वाहतूक करीत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.अपघात घडताच ट्रॅक्टर मालक घटनास्थळी येऊन अत्यंत शिताफीने जमाव बाजूला सारून ट्रॅक्टर नेल्याचे नागरिकात बोलले जात आहे.शहरात विना नंबर भरधाव वेगाने चालत असलेल्या या ट्रॅक्टरचा पोलीस विभागाकडून शोध लागेल का याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे

Copyright ©