यवतमाळ सामाजिक

रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत, बिगर शेती व्यवसाय प्रशिक्षण घेण्यात आले.

 

वाकी या गावात रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत व संत कबीर संस्था चे सहयोगाने ‘विविध उद्योग व्यवसाय संधी’ या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. कोरोना आजाराच्या परिस्थितीत शासनाचा प्रत्येक नियमांचे काटेकोर पालन करून मास्क व सॅनिटायझर चा योग्य वापर करून सामाजिक अंतर ठेऊन हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.
या प्रशिक्षणात जिल्हा उद्योग केंद्र चे मा. अशोक कांबळे सर यांनी, बिगर शेतीवर आधारित असणारे उद्योगाचे प्रकार गावातील तरूण वर्ग यांना समजावून संगितले. व्यवसाय करत असतांना व्यवसायिकामध्ये कोणते गुण आवश्यक आहे त्या बद्दल सांगण्यात आले. कोणते उद्योग कोणत्या प्रकारात मोडतात यांची माहिती देण्यात आली. सरकारी व उद्योग भवन मार्फत असलेल्या योजनेची माहिती देण्यात आली, त्याच बरोबर मुद्रा योजने बद्दल सांगण्यात आले. अनुदान मिळण्याच्या अटी व शर्ती सांगण्यात आल्या. या प्रकारे गावातील तरूण वर्ग यांना व्यवसाय बद्दल माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला गावाचे सरपंच विद्या ताई टेकाम, संत कबीर संस्था चे अरविंद बोरकर, रिलायन्स फाउंडेशन चे गौरव राऊत व गावातील तरूण वर्ग उपस्थित होते…

Copyright ©