Breaking News यवतमाळ सामाजिक

माजी आमदार प्रा. राजु तोडसाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार

——————————————–
🔵 घाटंजी विश्राम गृहच्या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत २९ जुलै चा मुहूर्त ठरला.
——————————————–

घाटंजी 29 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबत घाटंजीच्या विश्राम गृहावर आर्णी – केळापूरचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम व तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पारवा, शिवणी, घोटी, पार्डी (नस्करी) जिल्हा परिषद विभागातील शेकडो कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
प्रा. राजु तोडसाम हे आपल्या कार्यकर्त्यांसह 29 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सह सहकारी संस्थेच्या निवडणूका लढण्याचा निर्धार करण्यात आला. तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रा. तोडसाम च्या शब्दाला होकार देऊन या नंतरच्या सर्व निवडणुका लढवीण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी घाटंजी पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश धुर्वे, भाजपा युवा मोर्चाचे माजी शहर अध्यक्ष विनय जाधव, प्रदीप ठोंबरे, सरपंच कणाके, प्रमोद गेडाम, अमोल गेडाम, गणेश चव्हाण, कृष्णा पेंडपवार, माजी सरपंच अनुप देठे, गजानन मस्के, सुर्यकांत कोहरे, अनिल मोचावार, नरेश चव्हाण या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

————————————
आपण कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार, राज्याचे उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार यांची भेट घेउन चर्चा केली असून यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते आदींना विश्वासात घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहोत…
प्रा. राजु तोडसाम
माजी आमदार, आर्णी – केळापूर

Copyright ©