यवतमाळ सामाजिक

आर्णी मोमीनपुरा भागातील विहिरीचा भोंगळ कारभार

.
आर्णी मोमीनपुरा प्रभाग क्र.०७ मधील विहिरीचे बांधकाम आत्तापर्यंत झालेले नाही. ह्या परिसरात जवळपास ५००० लोकांना ह्या विहिरीचा पाणी पुरवठा आहे.
ही विहीर नाल्याला लागून असून विहिरीजवळ अतिशय घनदाट झाडे वाढवलेली आहेत,विद्यमान नगसेवकांना आत्तापर्यंत जवळपास तीन चार वेळा सांगून सुद्धा ह्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. मुख्याधिकारी व नगरसेवकांना ह्याचे भानच नाही.विहिरीत लहान मुले झाकून पाहतात व त्या परिसरात खेळतात त्यामुळे लहान मुले विहिरीत पडण्याची दाट शक्यताही आहेत.एकेकाळी मायनरल वॉटर देण्याची आश्वासने देणारी हिच नगरपरिषद अयशस्वी आहे. ह्या परिसरात जास्तीत जास्त रोजमजुरी करणारे लोक राहतात,ह्या निष्कृष्ट पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही; तरीही विद्यमान नगरपरिषद प्रशासनाने ह्याकडे लक्ष द्यावे व विहिरीची उंची वाढवून विहिरीवर लोखंडाची मोठी जाळी लावावी जेणेकरून विहिरी जवळील खेळणाऱ्या लहान मुलांच्या जीवाला धोका होऊ नये अशी मोमीनपुरा प्रभाग क्र.०७ मधील लोकांची विनंती व मागणी आहे.

Copyright ©