यवतमाळ सामाजिक

कुर्ली प्रकरणात शिक्षकावर नोंदवलेले खोटे गुन्हे मागे घ्या

 

पालक ,ग्रामस्थ,व शिक्षक संघटनांची मागणी

घाटंजीः तालुक्यातील उ.प्रा.म. शाळा कुर्ली येथील शिक्षिका कुमारी माधुरी इथापे यांनी दिनांक 12/ 7/ 2021 रोजी पारवा पोलीस स्टेशन येथे कुर्ली येथील दोन ग्रामस्थ व तीन शिक्षकांवर तक्रार देऊन गुन्हे नोंदविले .या प्रकरणात ही संपूर्ण तक्रार खोटी, आकसपूर्ण, व तथ्यहीन असल्यामुळे शिक्षकावर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात यावे व प्रकरणाची सखोल चौकशी करून शिक्षकांना न्याय देण्यात यावा या मागणी करता यवतमाळ जिल्ह्यातील २३ शिक्षक संघटनाच्या समन्वय महासंघ व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज च्या वतीने पोलीस अधीक्षक ,मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले
कुमारी माधुरी इथापे या कुर्ली शाळेच्या मुख्याध्यापिका असताना त्यांच्या कार्यकाळात ई क्लास जमिन, शौचालय बांधकाम व इतर बाबीत दहा लाखांचा भ्रष्टाचार शाळेत झाल्याची तक्रार गावातील माजी सरपंच विलास बडगुलवार यांनी केली होती. या प्रकरणाची तपासणी करून जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवून निलंबनासह इतर कारवाईची शिफारस केली होती .या घटनेचा आकस बाळगत त्यांनी तक्रारकर्ता,सरपंच व शाळेतील तीन शिक्षकांविरुद्ध खोटी तक्रार केली असल्यामुळे शिक्षकांना विनाकारण या प्रकरणात गोवण्यात येऊ नये व त्यांना न्याय मिळावा ही मागणी गावातील ग्रामस्थ व पालकांनी केली असून शिक्षकांचे शाळेतील विद्यार्थी , पालक व गावकऱ्यांची संबंध जिव्हाळ्याचे व सलोख्याचे असून त्यांचे शैक्षणिक कार्य उत्तम असल्याचे निवेदन ठाणेदार पारवा यांना दिले आहे.
या प्रकरणाच्या अनुषंगाने गावातील राजकारणामध्ये शिक्षकांचा नाहक बळी जाऊ नये हि समाज भावना जोर धरत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©