Breaking News यवतमाळ सामाजिक

दिग्रस – पुसद बायपास वर सुदर्शन नगर जवळ बस व मोटर सायकल चा भीषण अपघात एक जागीच ठार तर दुसरा उपचारादरम्यान मृत्यू

 

दिग्रस – पुसद बायपास वर आज रोजी सकाळी अंदाजे ११:३० वाजता च्या दरम्यान दुचाकी व एसटी बस च्या धडकेत एक युवक जागीच ठार एक ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

सविस्तर वृत्त असे की परभणी वरून बस क्रमांक एम एच 20 बी एल 25 27 क्रमांकाची बस दिग्रस मार्गे चंद्रपूर येथे जात असताना दिग्रस पुसद बायपास वर सुदर्शन जवळ बस व दुचाकी मध्ये धडक झाल्याने दुचाकी क्रमांक एम एच 29 बी एम 42 34 या दुचाकीवरील दुचाकीस्वारस जबर धडक लागल्याने शहरातीलच देवनगर येथील रवी रमेश पुंडे वय 18 हा युवक जागीच ठार तर दुसरा पवन मुलायमसिंग गावंडे वय 17 दिग्रस ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच दुसऱ्याही दुचाकी क्र एम एच 38 वाय 6439 स्वराच्या नजरेसमोर हा अपघात झाल्याने त्या दुचाकी स्वराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीवरून केशव प्रल्हाद चव्हाण सावधगिरी बाळगून उडी मारल्याने किरकोळ जखमी झाले व दुचाकी एसटी बसच्या खाली चिरड्याची घटना घडली आहे पुढील तपास दिग्रस पोलीस करीत आहे

Copyright ©