यवतमाळ सामाजिक

सुसंस्कार विद्या मंदिराचा सलग आठव्या वर्षीही १०० टक्के निकाल

{कु. शर्वरी वरुडकर ९९.२०% शाळेतुन प्रथम,कु. रुद्रायणी देशपांडे ९९% द्वितीय, तर पलाश चिंतावार ९८.६०% तृतीय}

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सुसंस्कार विद्यामंदिराने सलग आठव्या वर्षीही आपली यशाची परंपरा कायम राखत शाळेचा १०० टक्के निकाल देत शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शाळेचे सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले आहे.
कोरोना महामारीच्या संकटाशी सामना करत ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करून सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. कु. शर्वरी वरुडकर हिने ९९.२०% प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कु. रुद्रायणी देशपांडे हिने ९९% प्राप्त करून द्वितीय तसेच पलाश चिंतावार याने ९८.६०% प्राप्त करून शाळेमधून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
तसेच समीर संगेवार९७. ४०%, आयुष काळे९६. ४०%,अदी खान ९६.४०%, खुशबू जाजू ९६%, शांभवी पांडे९४. ८०%, पल्लवी बिसेन९४. ६०%, सृष्टी राजगुरे ९४.२०%, इशिता प्रेमचंदानी९२%, भूषण लूनावत ९०.८०%, सानिका उईके९०. २०% या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
तसेच सर्वेश वानखेडे, लक्ष्मी नागपुरे, सोहम देशपांडे, कशिश ताटीपामुलवार, इशान जयस्वाल, टीशा प्रेमचंदानी, सिया जयस्वाल, चंचल चव्हाण, स्वरांगिनी कुडमेथे, सुजल जोगी, आयुष बारी, भक्ती भिरंगी, शामली खोडे, साहिल गोडे, अथर्व काळे,सुमेध भोयर, हर्ष देशमुख, कपीश त्रिवेदी, हर्षद गांगेकर, सोनाक्षी शिंदे, शंतनु भस्मे या विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्राप्त केली.
व यश केदारे, युवराज शर्मा, यशश्री भांदक्कर, यश डीके, अंकित गुप्ता व आयुष जैन यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले. आणि सलग ७ वर्षापासूनची १००% टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष हर्षवर्धन बोरा, उपाध्यक्ष सुनील गुगलिया, सचिव के. संजय सर, प्रवीण लूनावत, गणेश गुप्ता, मनोज लूनावत, राजेश गुप्ता तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. के. उषा यांनी अभिनंदन केले व शाळेला एक विशिष्ट उंचीवर नेल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व उज्वल यशाबद्दल शुभेच्छा देत त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सुसंस्कार विद्या मंदिराच्या उत्तुंग अशा यशाबाबत सर्व स्तरावरून शाळेचे कौतुक होत आहे.

Copyright ©