Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात तीन पॉझिटिव्ह रुग्ण; चार कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1874 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 16 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर चार जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1333 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी तीन पॉझिटिव्ह तर 1330 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 20 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72779 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70973 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 90 हजार 65 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 17 हजार 43 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.55 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.23 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1874 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 31 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1874 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 618 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 9 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 627 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 3 रुग्णांसाठी उपयोगात असून 629 बेड शिल्लक आहेत.

___________________________________

राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील कामागिरी प्रमाणपत्रासाठी

खेळाडूंनी २० ऑगस्टपुर्वी अर्ज करावे

यवतमाळ, दि. 16 जुलै : केंद्र शासनाच्या आयकर विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आंतरविद्यापीठ इत्यादी खेळाच्या स्पर्धेत सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या खेळाडू भरती करीता जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यात आवेदन करण्यासाठी राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील कामगिरी प्रमाणपत्राची आवश्यकता असलेल्या संबंधीत खेळाडूनी दिनांक २० ऑगस्ट पुर्वी जिल्हा क्रिडा कार्यालयास अर्ज सादर करावे.

जाहिरातीमध्ये प्रसिध्द करण्यात आल्यानुसार परिच्छेद-२ मध्ये पात्र खेळ प्रकार नमुद केले असून, त्यानुसार फक्त पुरुष व महिला खेळाडूंकरीता एकूण अनुक्रंमांक १ ते १६ हे खेळ समाविष्ठ असुन यामध्ये मैदानी स्पर्धा, जलतरण, स्क्वॅश, बिलियडर्स, बुध्दीबळ , कॅरम , ब्रिज,बॅडमिटन, लॉनटेनिस , टेबल टेनिस, शुटींग, वेटलिफ्टींग, कुस्ती, बॉक्सींग, ज्युदो व जिम्नॅस्टिक्स य खेळाकरीता महिला व पुरुष हे दोन्ही खेळाडू आवेदन पत्र सादर करु शकतात. परंतु बॉडी बिल्डींग (७० किलो आतील व ७० ते ८० किलो) व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी व क्रीकेट या ५ खेळाकरीता फक्त पुरुष खेळाडू आवेदनपत्र सादर करु शकतात. उपरोक्त ५ खेळाकरीता माहिला खेळाडू आवेदनपत्र सादर करु शकत नाही असे परिपत्रकात नमुद करण्यात आलेले आहे.

मा. सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा, म.रा. पुणे यांचे दि. १२ जुलै २०२१ च्या पत्रान्वये जाहिरातीमध्ये नमुद करण्यात आलेल्या परिच्छेद ३ मधील मुद्दा क्र. (III) अन्वये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजीत केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत. परिच्छेद ४ व परिच्छेद ५ मधील मुद्दा क्रमांक (IV) अन्वये संबंधीत खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगीरी पाहता

संचालनयाव्दारे प्रमाणीत करुन देणे आवश्यक आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील जे खेळाडू भरतीच्या अनुषंगाने अर्ज दाखल करीत आहे व जे खेळाडू भारतीय शालेय महासंघाव्दारे आयोजीत (S.G.F.I.) राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग , प्रविण्य प्राप्त केलेले आहे. व जाहिरातीमध्ये नमुद करण्यात आलेल्या खेळानुसार व वयोमर्यादेनुसार पात्र ठरणार आहेत. फक्त अशा सर्व खेळाडूंनी भारतीय शालेय महासंघाव्दारे आयोजीत (S.G.F.I.) राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग, प्रविण्य प्राप्त केलेले आहे. अशा खेळाडूंनी आपल्या क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र विहित नमुन्यातील अर्ज परिपुर्ण भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत दि.२० ऑगस्ट २०२१ पुर्वी सादर करावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी कळविले आहे.

___________________________________

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलै पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 16 जुलै : शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाकडे अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. यापुर्वी पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत १५ जुलै होती.

पीक विम्यासाठी वाढवून मिळालेल्या मुदतीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा व आपले अर्ज २३ जुलै २०२१ पुर्वी सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

____________________________________

सोयाबीन पिकातील किड व्यवस्थापन योग्य वेळी करा

यवतमाळ, दि. 16 जुलै : काही शेतक-यांच्या शेतावर सोयाबीन पिकाची पाहणी करुन किड सर्वेक्षण केले असता खोड माशीचा पादुर्भाव दिसुन आला आहे. यापासुन पीक संरक्षणाकरिता पावसाची उघडीप मिळाल्यास त्वरीत 5 टक्के निबोळी अर्काची फवारणी करावी तसेच सोयाबीन पिकावरील खोडमाशी व चक्रीभुगां किडीने आर्थीक नुकसान पातळी ओलांडली असल्यास (5 ते 10 टक्के पादुर्भावग्रस्त झाडे किंवा रोपे ) रासायनीक किड व्यवस्थापणाकरीता केंद्रीय किटकनाशक मंडळ फरीदाबाद यांचे लेबल क्लेम नुसार इथीऑन 50 टक्के इ.सी 15 ते 30 मिली किवां इंडोक्झाकार्ब 9.5 टक्के + थायमिथोक्झाम 12.6 टक्के झेडसी 2.5 मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. तसेच काही शेतक-यांच्या सोयाबीन, कापुस पिकावर वाणु किडीचा व रोपे कुरतडणा-या अळीचा पादुर्भाव आढळल्यास क्लोरपायरीफोस20 टक्के इसी 37.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन पिकाभोवती ड्रेचिंग करावी. फवारणी करतांना सुरक्षाकिट वापरावी व विषबाधा होऊ नाही याकरीता काळजी घ्यावी अधिक माहीती करीता कृषि सहाय्यक,कृषि पर्यवेषक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, यांच्याशी संपर्क साधावा, असे उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी कळविले आहे.

Copyright ©