यवतमाळ सामाजिक

अखेर अतिक्रमण काढण्यासाठी भांबराजा येथे दोन तास चक्का जाम

 

भांब राजा येथे सायंकाळी 6 .30 वाजता पासून नागपूर ते तुळजापूर राष्ट्रीय राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू केले हे आंदोलन जवळपास दोन तास
सुरू असल्याने राज्य माहामार्गावरील दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडून धरण्यात आली राज्य महामार्गावर नाली बांधकाम केले ती नाली उंच झाली रस्त्यांनी येणारे पाणी नाली मध्ये न जाता गावात अनेकांच्या घरात शिरत आहे हि नाली पूर्णतः बंद असून त्या मुळे परिणामी अनेकांच्या नुकसानीचे परिणाम सर्व सामान्यांनवर होत आहे या प्रकरणी जिल्हा अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार याना वेळोवेळी निवेदने देऊनही दखल न घेतल्याने हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले दोन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती अखेर शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी मधस्ती करून आठ दिवसाच्या आत येथील समश्याच निराकरण करण्याचे उपविभागीय दंडधिकारी यांनी यावेळी सांगितले यवतमाळ येथील तहसीलदार कुणाल झालटे याच्या समवेत चार ठाण्यातील पोलिसाचे ताफे तैनात होते यामध्ये राखीव दल, एस डी पी ओ, लोहारा येथील कोयल, यवतमाळ शहरचे सिरसकर, आर्णी येथील जाधव,आणि यवतमाळ ग्रामीणचे जूनघरे घटना स्थळी पोलिसांच्या ताफ्या सह बंदोबस्त लावण्यात आला होता हे आंदोलन सुनील डीवरे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थअनिल डीवरे स्वप्नील डीवरे धमू रामटेके,प्रवीण सोनावणे,राजेश नेवार ,धीरज उईके,सरपंच अनुप्रिता डीवरे,विद्या नेवारे , कोवासाल्या खंडारे,कांता भोयर,लीलाबाई शर्मा,इंदिरा वाघाडे,मनीष सोणवाने,जयश्री उईके, प्रीती राऊत,कामला मोडी,राजसोरी मोडी,रामबाई मोडी,निर्मला उईकें,सुनील डीवरे,नारायण खंडारे,जगेस्वर शर्मा, दिलीप भोयर सहभागी झाले होते

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©