Breaking News यवतमाळ सामाजिक

गोवंश तस्करीचा ट्रक व जनावरे पोलिसांच्या ताब्यात

——————————————-
गुप्त माहिती वरुन जोडमोहा येथिल ग्रामीण पोलिसाची कारवाई
——————————————-
यवतमाळ- बुधवारच्या रात्री दरम्यान यवतमाळ ग्रामीण पोलिस रात्र गस्त घालीत असताना कळंब मार्गे जनावरांनी भरलेला ट्रक येत असल्याची विश्वसनीय गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून नाका बंदी करून हा ट्रक जोडमोहा मार्गे येणार हे निश्चित करून जोडमोहा येथे पोलीस थांबले तोच ट्रक आला. पोलिसांचा ताफा पाहून ट्रक ड्रायव्हर ने ट्रक क्रमांक एम. पी.२८ एच ०६५५ थांबविला मात्र अंधाराचा फायदा घेत त्याने त्याठिकानावरून पळ काढला तोच त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नाही. तो ट्रक त्याब्यात घेवून चौकशी केली असता गोवंश जातीचे ३२ गोऱ्हे त्यांची किंमत तीन लाख विस हजार रुपये असे मिळून आले. यात दोन जनावरे मृत अवस्थेत आढळले. या कारवाईत ट्रक ची किंमत चौदा लाख रुपये व जनावरांची किंमत तीन लाख वीस हजार रुपये असे एकूण सतरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून फरार झालेल्या ड्रायव्हरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एवढी मोठी कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगला बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार किशोर जूनघरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, पोहेका. यादव हांडे, पोना. संदीप मेहत्रे, सचिन, पो. शिपाई नेवारे यांनी केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून गोवंश तस्करी करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. पुढील तपास ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ ग्रामीण पोलिस करीत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©