यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम

 

कोरोना 19या महामारीच्या काळात, संपूर्ण जग 2020 पुर्ण संघर्षात गेले, या काळात, सगळेजनजीवन विस्कळीत झाले असून याचा प्रभाव शिक्षणक्षेत्रावर कमालीचा झालेला आहे, अगदी महाविद्यालय ते प्राथमिक शाळा, या काळात संपूर्ण देशात सामाजिक अंतर पाळणे आवश्यक व बंधनकारक होते, म्हणूनच तर संपूर्ण महाराष्ट्रात शाळा बंद ठेवण्यात आले होते.
सदर काळात शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गजानन गोपेवाड शिक्षक यांनी आँनलाईन पद्दतीने अभ्यास विद्यार्थ्यांना देऊ लागला, विविध सोशल मीडिया नेटवर्क चा वापर करून जसे, टेलग्राम, फेसबुकवर, वँटस ऐप गृप करून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, ब्लाँगवरून, झूम मिटिंग, गुगल मीट, पी, डि एफ फाईल स्वरूपा, गुगल फार्म,ई एक नव्हे नानाविध नेटवर्क तयार करून फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात कायम स्वरूपी ठेवण्यासाठी गजानन गोपेवाड या शिक्षकांनी मेहनत घेतली आहे.

Copyright ©