यवतमाळ सामाजिक

भांबोरा येथे बनावट पावतीने कर वसूली

. घाटंजीः- तालुक्यातील भांबोरा येथे बनावट पावती बुका व्दारे नागरीका कडून कर वसूली करुन अपहार केल्याची तक्रार ग्राम पंचायत सदस्य सहदेव राठोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे केली आहे.
भांबोरा ग्रामपंचायतचा कर्मचारी दिलीप राठोड यांनी वार्ड क्र .३ , मालमत्ता क्र .८१ , नाथीबाई मोतीलाल राठोड , पावती क्र .४५ ची बनावट पावती बुक द्वार रक्कम वसूल करुन अपहार केल्याबाबत .१ ९ जून रोजी सचिव यांनी त्या कर्मचाऱ्याला नोटीस बजावली . तसेच दि .२५ जून रोजी कार्यालयीन कामकाजामध्ये अपहार केल्याबाबत खुलासा सादर करण्या बाबतचे कारणे दाखवा नोटीस देण्यात आली .परंतु अजूनपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही . भांबोरा येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रपत्र – ड मध्ये ऑनलाईन नोंदणी करणे सुरु आहे . याकरिता नागरिकांकडून टॅक्स वसुली करण्यात येत आहे . या कर्मचाऱ्याने गांवातील बऱ्याच नागरिकांकडून बोगस पावती देऊन अपहार केल्याची शक्यता नाकारता येत नाही . शासनाच्या आपले सरकार पोर्टल वर याबाबतची गृह विभागाकडे पोर्टल २९ जूनला तक्रार दाखल करण्यात आली .चौकशी करुन संबधीत कर्मचाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी .अशी मागणी सहदेव राठोड यांनी तक्रारीतून केली आहे.

Copyright ©