Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 6 पॉझिटिव्ह रुग्ण; 5 कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1874 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 14 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 5 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 795 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 6 पॉझिटिव्ह तर 789 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 22 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72775 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70967 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये दारव्हा, मारेगाव व वणी येथील प्रत्येकी एक तर यवतमाळ येथील तीन रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 87 हजार 618 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 14 हजार 828 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.58 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.75 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1874 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 31 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1874 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 618 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 9 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 627 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 3 रुग्णांसाठी उपयोगात असून 629 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©