महाराष्ट्र सामाजिक

गवळी समाजाच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन

अम.12 जुलै 21 : महाराष्ट्र गवळी समाज संगठना ही महाराष्ट्रातील वास्तव्यत करणाऱ्या 10 लक्ष पेक्षा जास्त समाजबाँधवाचे नेतृत्व करीत आहे. हा वर्ग राज्यात भटकी जातीच्या ब प्रवर्गात मोडतो आणि केंद्र शासनाच्या ओबीसी संवर्गात येतो. भारतीय राज्यघटने नुसार राज्यातील 27 मनपा,34 जिल्हापरिषदे, 364 पंचायत समिति/नगर पंचायती आणि 27000 ग्राम पंचायत मधुन ऐकूण 56000 ओबीसी लोकप्रतिनिधि निवडून येतात.
2018 मधे जेव्हा ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयात आव्हान देण्यात आलं, तेंव्हा सुप्रीमकोर्टानी स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द करताना २०१० मधील कृष्णमुर्ती खटल्यातील ट्रिपल टेस्ट पास करणे अनिवार्य केले होते, आणि ओबीसीचे 27 % आरक्षण कायम ठेवून ओबीसीची खानेसुमारी, मागसलापण ई.ची माहिती सादर करायला सरकारला सांगितला होता, ट्रिपल टेस्ट पास करण्यासाठी इंपिरिकल डाटा म्हणजेच जातनिहाय लोकसंख्येची आकडेवारी गरजेची आहे. सद्यास्थितीला इंपिरिकल डाटा कुठून येईल, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.
तेंव्हाच्या तत्कालीन सरकारने तर स्वतः इंपिरिकल डाटा जमा केलाच नाही, परंतु केंद्र सरकारकडे जो आयता इंपिरिकल डाटा होता तोही मिळवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने इंपिरिकल डाटा मागितला असून त्याशिवाय रिलीफ द्यायला आता नकार दिला आहे. इंपिरिकल डाटा शिवाय आरक्षण लागू होणार नाही, हे स्पष्ट आहे.
म्हणून गवळी समाजाची सर्वोच्च संगठना महाराष्ट्र गवळी समाज संगठन (५४९) तर्फे सम्पूर्ण महाराष्ट्रात 12 जुलै 2021 रोजी दुपारी 12 .00 वा. सर्व जिल्ह्यातील संगठनेच्यावतीने जिल्हा व तालुका पातळीवर जिल्हाधिकारी किंवा समकक्ष एसडीओ/तहसीलदार यांना निवेदने देवून 1 तासाचे धरणे आंदोलन करण्यात आले होते.
संघटनेची मांगणी खालील प्रमाणे आहे –
१) राज्यातील ओ.बी.सी.चे राजकिय आरक्षण पुर्ववत करण्यासाठी ओ.बी.सी.ची जात निहाय जनगणना त्वरित करण्यात यावी.
२) महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांचे करिता एकूण पदाच्या ३३% पदे राखीव ठेवुन अन्य पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्याचे आदेश त्वरित पारित करावे.
राज्य व जिल्हा कार्यकरिणीच्या आदेशानुसार संगठनेच्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील समाजबाँधवानी एसडीओ किंवा तहसिलदाराना निवेदन दिले, अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुका आणि धारणी तालुकाच्यावतीने संगठने कडून एसडीओ अचलपुर आणि एसडीओ धारणी यांना निवेदन देवून त्याच परिसरात एक तासाचे लाक्षणिक धरणे देण्यात आले. निवेदन देताना सँगठनेचे मगस अचलपुर तालुकाचे अध्यक्ष गजाननराव येवले सोबत मनोज नंदवशी (नगर सेवक अचलपूर),सोनू शामाजी खडके, शेख राजुभाऊ पक्केवाले (चौधरी) ,देविदास झिगाजी शनवारे,श्रीधर गावंडे, शेख कमर पक्केवाले , शेख अनवर चौधरी, मो.अतीक हेमावाले, सरफराज खान उपस्थित होते , तसेच धारणी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्य्क जिल्हाधिकारी श्री वैभव वाघमारे यांना धारणी मेळघाट जि.अमरावती यांचे वतीने ओबीसी आरक्षण बाबत निवेदन देण्यात आले , या वेळी गवळी समाज संघटना धारणी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.

Copyright ©