यवतमाळ राजकीय सामाजिक

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे वाढदिवसाचे निमित्य शिवसेनेचा उपक्रम

घर-आंगण चंदन उपक्रमाचा शुभारंभ

 

27 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे.या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन दरवर्षी केल्या जाते. ह्या वर्षी शिवसेनेचे माजी मंत्री व आमदार संजय राठोड यांचे पुढाकारातून घर-आंगण चंदन हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यात पाच हजार चंदनाची झाडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.यवतमाळ शहर व तालुक्यात प्रथम खेपे मध्ये पाचशे चंदनाची झाडे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आज शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे व जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत ह्या उपक्रमाचे स्थानिक टिळक स्मारक मंदिर येथे उदघाटन करण्यात आले.ह्या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे,उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे,तालुका प्रमुख संजय रंगे ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवसेना पक्ष हा ऐंशी टक्के समाजकारण ह्या तत्वावर चालत असल्याने शिवसैनिक शिवसेनेच्या नेत्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाचे माध्यमातून राबवत असतो.ह्या वर्षी हा अभिनव उपक्रम शिवसेनेने हाती घेतला आहे.सध्या माजीमंत्री आमदार संजय राठोड यांचे पुढाकारात पाच हजार चंदनाची रोपटी उपलब्ध झाली असून नागरिकांच्या मागणी अनुसारे अजून रोपटी उपलब्ध केल्या जातील असे शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे ह्यांनी सांगितले.चंदनाचे हिंदू धर्मात अतिशय महत्व असून चंदनाचे झाड हे प्रत्येक अंगणात असायला हवे.चंदनाचे झाड हे नुसते बी पेरून उगवत नाही तर ह्या झाडाची रोपटी उगवताना विशेष काळजी घ्यावी लागते अशी माहिती जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिली.ह्या प्रसंगी बोरी शहर प्रमुख रवी जाधव,उपतालुका प्रमुख चंद्रकांत उडाखे,गजानन पाटील,राजू धोटे,संदीप सरोदे,अरुण वाकळे, अमोल धोपेकर,सुनील डिवरे,प्रवीण निमोदीया,प्रा राजेश चव्हाण,लताताई चंदेल,शैलेश गाडेकर,अनिल यादव,रुपेश सरडे,नगर सेवक उद्धवराव साबळे,पंकज देशमुख,युवासेना शहर प्रमुख निलेश बेलोकार,योगेश भांदक्कर,सतीश सकट, उमेश पुडके,कृष्णराव इरवे,तुषार देशमुख,शैलेंद्र तांबे,राजू कोहरे,शंकर देऊळकर,सचिन बारस्कर,जयराज बहादुरे,सुरेश चुनारकर,अभिनव वाडगुरे,मनीष लोळगे,श्याम थोरात,राजू राऊत,राहुल गंभीरे,फिरोज पठाण,नंदकिशोर गुल्हाने,डाबरे सर,संगीता पुरी,नंदा भिवगडे,गोलू जोमदे,संतोष चव्हाण,चेतन क्षिरसाठ,विशाल भिवगडे,बाळासाहेब जयसिंगपूरे,पप्पू गजभे व शहरातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.आज पहिल्या दिवशी विविध कुटुंबियांना मोठ्या संख्येने चंदन रोपटे वाटप करण्यात आले.

Copyright ©