Breaking News यवतमाळ राजकीय शैक्षणिक सामाजिक

परदेशात नोकरीसाठी उपयोगी ठरणारे लघु अभ्यासक्रम सुरू करा. मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

परदेशात नोकरीसाठी उपयोगी ठरणारे लघु अभ्यासक्रम सुरू करा

तंत्रशिक्षणच्या आढावा बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

– अभियांत्रिकीची रिक्त पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरणार

यवतमाळ दि. 9 जुलै : शासन दर्जा असलेल्या एमएसबीटीईकडे अल्प कालावधीचे सुमारे 59 अभ्यासक्रम उपलब्ध असून सदर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीसाठी उपयोगी पडणार असल्याने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी असे जास्तीत जास्त अभ्यासक्रम शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरू करण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ या संस्थांचा आढावा आज शासकीय तंत्रनिकेतनच्या कान्फरन्स हॉल मध्ये मंत्री उदय सामंत यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदा पवार, आमदार संजय राठोड, शिक्षक आमदार किरण सरनाईक, नगराध्यक्षा कांचन चौधरी, उच्च व तंत्रशिक्षणचे सहसंचालक डॉ. राजेंद्र मोगरे प्रामुख्याने उपस्थित होते.

तंत्रनिकेतन येथे ड्रेस डिझायनिंग व गारमेंट मॅन्युफॅक्चरींग हे बंद करण्यात आलेले अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांनी केल्या. तसेच यवतमाळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त पदभरतीस विलंब लागत असल्याने सध्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून ही पदे बाह्ययंत्रणेद्वारे (आऊटसोर्स) भरण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यास, त्यास तातडीने मंजुरी प्रदान करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

अभियांत्रिकी महाविद्यालयात सध्या एक कायम प्राध्यापक, शासकीय तंत्रनिकेतनमधून सेवा घेतलेले 10 प्राध्यापक व 35 करारतत्वरील असे एकूण 46 प्राध्यापक कार्यरत असून येथील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरून मिळण्याबाबत प्राचार्य सरोदे यांनी मागणी केली.

बैठकीला शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. धर्मपाल शिंगाडे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुहास पाटील व महाविद्यालयाचे प्राध्यापक व अधिकारी उपस्थित होते.

___________________________________

गेल्या 24 तासात शून्य पॉझिटिव्ह रुग्ण , 5 कोरोनामुक्त

* जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1879 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 9 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही तर 5 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 326 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी सर्व 326 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 20 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72755 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70949 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 85 हजार 128 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 12 हजार 323 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.62 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी शून्य आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1879 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 26 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1879 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 617 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 7 रुग्णांसाठी उपयोगात तर 629 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

__________________________________

व्हेंटिलेटर्सचा आरोग्य यंत्रणेने चांगला उपयोग करावा

– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

* जिल्ह्याला 8 व्हेंटिलेटर्स वितरित

यवतमाळ दि, 9 जुलै :- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स वाटप करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने या व्हेंटिलेटर्सचा चांगला उपयोग करावा, कोणत्याही इतर खाजगी रुग्णालयांना ते हस्तांतरित करू नये अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हेंटिलेटर्स लोकार्पण प्रसंगी दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे श्री सामंत यांनी फित कापून 8 व्हेंटिलेटर्सचे लोकार्पण केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, आमदार संजय राठोड, शिक्षक आमदार किरण सरनाईक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, नगराध्यक्षा कांचन चौधरी, पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटील भुजबळ उपस्थित होते.

यावेळी श्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी समनव्य ठेऊन कोरोनाचा लढा देत आहेत. यवतमाळ जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर आज शून्यावर आला आहे. कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर जाऊ नये यासाठीच डॉक्टरांनी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.

दुसऱ्या लाटेचा जसा आपण सामना केलात तशीच तयारी तिसरी लाट येणारच नाही यासाठी केली पाहिजे. तिसरी लाट ही लहान मुलांना जास्त बाधित करणार आहे असे तज्ञांचे मत आहे. याला प्रतिबंध करताना आपण पूर्वीपासूनच तयारीत असले पाहिजे अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रशासनसोबत काम करताहेत.

लसीकरणासाठी लसीचा पुरवठा कमी होत असल्याने त्याचा वेग वाढविणे प्रशासनाच्या हातात नसले तरी आहे त्या लसीचे व्यवस्थित नियोजन करून त्या जिल्ह्यातील सर्व भागात पोहचतील याची काळजी घ्यावी. तसेच पॉझिटिव्हीटी दर कमी राहील यासाठी कोविड चाचण्या वाढविण्यात याव्यात. बाजारपेठेत रँडम चाचण्या करण्यात याव्यात असेही श्री सामंत यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या आणि संभाव्य तिसऱ्या लाटेसाठीची तयारी याबाबत माहिती दिली. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेमध्ये 22 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती. तिसऱ्या लाटेसाठी शासनाने तिप्पट नियोजन करायला सांगितले होते, त्याप्रमाणे जिल्ह्यात 63.93 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तयार झाले असून 69.98 मेट्रिक टन चे निर्मिती प्रकल्प नियोजित आहे. सद्यस्थितीत 2416 सिलेंडर्स उपलब्ध असून त्याची क्षमता 23.31 मेट्रिक टन आहे, तसेच 12 मेट्रिक टन चे 765 सिलेंडर नवीन मागविण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होईल अशी खात्री श्री. येडगे यांनी दिली. यावेळी त्यांनी लसीकरणासंदर्भात सुद्धा माहिती दिली.

बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. रमा बाजोरिया इ. उपस्थित होते.

___________________________________

गेल्या 24 तासात शून्य पॉझिटिव्ह रुग्ण , 5 कोरोनामुक्त

* जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1879 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 9 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही तर 5 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 326 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी सर्व 326 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 20 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72755 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70949 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 85 हजार 128 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 12 हजार 323 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.62 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी शून्य आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1879 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 26 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1879 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 617 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 7 रुग्णांसाठी उपयोगात तर 629 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

___________________________________

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सोमवारी यवतमाळात

यवतमाळ दि. 9 जुलै : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण व खार जमिनी विकास मंत्री विजय वडेट्टीवार हे सोमवार दि.12 जुलै 2021 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि. 12 जुलै 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे नागपूरहून आगमन व राखीव. स. 11.15 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट. सकाळी 11.45 वा. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत व वि.जा.भ.ज. इ.मा.व. च्या आश्रमशाळा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 1 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 ते 3.30 राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 4.00 वा. यवतमाळवरून नागपूरकडे प्रयाण.

_________________________________

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज 15 जुलै पुर्वी बँक खात्याशी आधार संलग्न करा

यवतमाळ, दि.9 : समाज कल्याण कार्यालयामार्फत अनु. जाती,इमाव, विजाभज व विमाप्र च्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सन 2020 -2021 च्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती/ फ्रीशिप अर्जाचे कामकाज संबंधित सर्व महाविद्यालयांनी https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक व बँक खात्याशी संलग्न करून दिनांक 15 जुलै 2021 पूर्वी परिपुर्ण भरलेले अर्ज मुळ टिसी सह सादर करण्यात यावे.

विद्यार्थी सदर लाभापासुन वचिंत राहील्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील. तसेच पात्र विद्यार्थ्थाकडुन शुल्क घेता येणार नाही. संबधीत विद्यार्थींनी देखील अर्जाची नोंदणी करुन अर्ज महाविद्यालयात सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

Copyright ©