यवतमाळ सामाजिक

कोरोना काळात बंद असलेले बस फेरे पुर्वरत सुरू करा ___सरपंच प्रेम धुर्वे

 

नाकापार्डी ते यवतमाळ मार्गे जांब हि बस सेवा जवळ जवळ १ ते २ वर्षापासुन बंद आहे.करण्यात आली असल्याने ग्रामीण भागातील सर्व सामान्यांना अनेक समस्यांचां सामना करावा लागतो ग्रामीण भागातील मजुरांना कामे नाही काम शोधण्यास शहरात यावे लागते त्यांना बस नसल्याने अनेक संकटे समोर उभे रहात आहे बस ने ये जा करण्यास मजुर,शासकिय कामाकरीता, खाजगी नौकरी आणि शेतिविषयक कामासाठी ये जा करणारे बरेचसे लोक खाजगी वाहनाने कामाला जातात खाजगी वाहनाची वेळ ठरवलेली नसल्यामुळे कधी कधी हिवरी वरुन पायदळ यावे लागते त्यामुळे लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो.. याच अनुषंगाने नाका पार्डी येथील ग्रामंचायतीतर्फे विभागिय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यालय यवतमाळ परिवहन मंडळ नियंत्रक बी. मेश्राम यांना बस फेरी चालु करण्या संदर्भात निवेदन व ठराव ग्रामपंचायत नाकापार्डी याचे कडून सादर करण्यात आले..
तसेच बस फेरी चालू करण्यासंदर्भात चर्चा करुन बस फेऱ्या चालु करण्याचे आश्वासन देण्यात आले..
यावेळी निवेदन देताना ग्रामपंचायत नाकापार्डी चे सरपंच प्रेमराज धुर्वे,दिनकर भवरे, मयुर तिवारी, रोशन राणे, वैभव भवरे, अजय वाघाडे, निलेश भवरे, प्रविण पुसनाके, अशोक कोयरे हे उपस्थित होते…

Copyright ©