यवतमाळ सामाजिक

मराठी भाषा संवर्धन संस्थेद्वारे विजयकुमार ठेंगेकर सन्मानित

***********************************

ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन बहुद्देशीय संस्था, ढानकी ता. उमरखेड जि. यवतमाळ यांच्या द्वारा घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये यवतमाळ येथील ग्रामसेवक, युवा साहित्यिक तथा आकाशवाणी बालनाट्य लेखक विजयकुमार ठेंगेकर यांनी दुसरा क्रमांकाचा सन्मान प्राप्त केला आहे.

वणी येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात इतिहास संशोधक गणेश बुटे यांच्या हस्ते अमरावती येथील जेष्ठ साहित्यीक शिवा प्रधान, साहित्यिक तथा पी.एच.डी. मार्गदर्शक अनंता सूर, संस्थेचे राज्याध्यक्ष नागोरावजी कोम्पलवार, सुरेश पेंढरवाड यांच्या उपस्थितीत विजयकुमार ठेंगेकर यांना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले.

विजयकुमार ठेंगेकर यांनी साहित्य क्षेत्रात आजवर जिल्हा स्तरापासून तर राज्य स्तरापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे. तर सप्टेंबर महिन्यात मुंबई येथे होऊ घातलेल्या विशेष समारंभात त्यांना “राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्काराने” सन्मानित करण्यात येणार आहे. या सर्व यशासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Copyright ©