यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 5 कोरोनामुक्त ; 4 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1876- बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 7 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 4 जण पॉझेटिव्ह तर 5 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 677 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 4 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 673 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72753 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70941 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये नेर तालुक्यातील 1 आणि पुसद येथील तीन रूग्णांचा समावेश असून यात एक पुरुष तर तीन महिला आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 83 हजार 846 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 11 हजार 045 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.64 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.59 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1876 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 29 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1876 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 20 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 617 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 8 रुग्णांसाठी उपयोगात तर 628 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

_____________________________________

अल्पदरातील सॅनिटरी पॅड योजनेची माहिती जास्तीत जास्त मुलींना मिळावी

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम आढावासभेत जिल्हाधिकारी यांचे आवाहन

मैत्रि क्लिनिकमध्ये आरोग्य, आहार, स्वच्छता याबाबतचे माहीती

शाळा बंद असल्यामुळे घरोघरी आयर्न फॉलीक अॅसिडच्या गोळ्यांचे वाटप

यवतमाळ, दि.7, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजने अंतर्गत आशा स्वयम सेविके मार्फत सहा रुपयात एका सॅनेटरी पॅकेटची विक्री केली जाते, त्याचा लाभ जास्तीत जात मुलींना मिळावा या करिता अंगणवाडी व बचत गटाची मदतीने स्वच्छते बाबत जनजागृती करावी तसेच अस्मिता योजने अंतर्गत देखील अशाच कामाकरिता नाविण्य पुर्ण कार्यक्रमाची आखनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.

यवतमाळ राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत स्थानिक जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या माध्यमातुन राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाअधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेत नुकतीच संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, ,सामान्य,रुग्णालय,यवतमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी, डॉ. सुहास कोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तगडपल्लीवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रमोद सुर्यवंशी, उपशिक्षणाणिकारी माध्यमिक संदीप गुंडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रिती दुधे हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की ग्रामीण रूग्णलय व प्राथमिक आरोग्य केंद्रात किशोरवयीन मुला मुलीसाठी स्थापन केलेल्या मैत्रि क्लिनिकमध्ये आरोग्य, आहार, स्वच्छता याबाबतचे माहीती पत्रक वाटप करावे. साप्ताहिक विकली आयर्न फॉलीक अॅसिड सप्लीमेन्टेशन योजने अंतर्गत १० ते १९ वयोगटातील मुला मुलींना आठवड्याला एक गोळी अॅनिमिया कमी करण्या करिता शाळा व कॉलेज मधुन दिल्या जाते, तसेच शाळाबाह्य मुलींना अंगणवाडी मधुन गोळयांचे वाटप केले जाते. परंतु शाळा कॉलेज बंद असल्यामुळे आशा स्वयम सेविके कडुन घरोघरी निळ्या रंगाच्या आयर्न फॉलीक अॅसिडच्या गोळ्यांचे वाटप केल्या जात आहे.त्या सर्व मुला-मुलींपर्यत पोहचतील याची दक्षता घ्यावी व ज्या मुला मुलींपर्यत या गोळ्या पोहचल्या आहे त्यानी त्याचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Copyright ©