यवतमाळ सामाजिक

युगपुरुष स्वामी विवेकानंद पुण्यतिथी साजरी

अखिल विश्वामध्ये वैराग्याची पताका ज्ञान साधनाने फडकवणारे स्वामी विवेकानंद यांचा पुण्यतिथी सोहळा जवळा येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोतराव डुकरे माजी केंद्रप्रमुख पंचायत समिती आरणी तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण अभ्यासक सुहास पंचभाई तथा गुरुकुल प्राथमिक शाळेचे प्राचार्य ज्योतीपाल देशपांडे उपस्थित होते. युगपुरुष स्वामी विवेकानंद तथा संस्थेचे मूळ संस्थापक स्व. भारतसिंह ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. .सुहास पंचभाई यांनी महाविद्यालयात लावण्यासाठी चारोळी या लुप्त होत जाणाऱ्या झाडाचे रोपटे भेट दिले तथा त्याचे संगोपन महाविद्यालयाने करावे असे मत व्यक्त केले. covid-19 नियमावलीचे पालन करत सदर सोहळा गुरुकुल इंग्लिश स्कूल जवळा, स्व. भारतसिंह ठाकूर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जवळा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे अभ्यास केंद्र जवळा कोड क्रमांक 14 117 तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे चे माहिती केंद्र कोड क्रमांक 673 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेला होता
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किरण चांहादे ,निलेश लोखंडे, किशोर बद्नोरे यांनी प्रयत्न केले

Copyright ©