यवतमाळ सामाजिक

ठाणेदार पितांबर जाधव यांच्या बदलीने आर्णीकर संतप्त

 

बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी शहर ठेवले कडकडीत बंद

आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांची अचानक तडकाफडकी दिनांक 5 जुलै ला बदली करण्यात आली. त्यामूळे आर्णी तील नागरिक चांगलेच संतप्त झाले आहे बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिनांक 7 जुलै रोजी बुधवार ला शहरात सर्वपक्षीय कडकडीत बंद पुकारले होते.
आर्णीतील नागरिकांनी बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आर्णी कडकडीत बंद ठेवले आहे
ठाणेदार पीतांबर जाधव हे आर्णीला रुजु झाल्याबरोबर त्यांनी विदर्भात कुप्रसीद्ध असलेले आर्णीतील प्रेमनगर खाली केले.
अवैध धंदे बंद करण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला व शहरात एक शिस्त लावली परंतु अचानक त्यांची बदली झाल्याने पुन्हा अवैध धंदे फोफावण्याची चिन्हे निर्माण झाली आहे त्यामुळे तालुक्यातील जनता कर्तव्यदक्ष अधीका-याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला या दरम्यान बदली रद्द करण्यासंबंधी जोरदार नारेबाजी करण्यात आली. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांना तहसीलदारांमार्फ़त निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल आडे,शिवसेनेचे तालुका प्रमुख रवी राठोड,शहर प्रमुख पंकज शिवरामवार,पंचायत समिती सदस्य अनुप जाधव,भाजपचे तालुका अध्यक्ष विपिन राठोड,शहराध्यक्ष विशाल देशमूख,जिल्हा सचिव राहुल सोयाम, कॉंग्रेस चे नगरसेवक अनवर पठान,राष्ट्रवादी चे विरोधी पक्षनेते चिराग शाह,नगरसेवक निलंकुश चव्हाण,मनसे चे तालुका अध्यक्ष सचिन येलगंधेवार , बसपा चे गजानन गोडवे,समाजीक कार्यकर्ते युनुस शेख,फयाज सैय्यद,रामेश्वर चौधरी,जावेद काजी,विवेक दहीफळे, दत्ता हुलगुंडे,विनोद राठोड, यांच्या सह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©