यवतमाळ सामाजिक

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय शासकीय इमारतीत तात्काळ स्थलांतरीत करा

 

भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष मो. आतीक यांचे मंत्री नवाब मालिक यांना आव्हान

दिग्रस भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा विभागाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी विराजमान होताच मोहम्मद आतीक यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ या कार्यालयाला भेट दिली असता या कार्यालयाचा केव्हाच बोजवारा उडाला हे लक्षात आले उद्योग भवन, सामाजिक न्याय विभाग अशा अनेक विविध ठिकाणी या महामंडळाच्या कार्यालयाची जागा नेमकी कुठे आहे कार्यालय कुठे स्थलांतरित केले आहे, का कार्यालय जाणीवपूर्वक अज्ञातस्थळी ठेवून अल्पसंख्यांक समाजावर अन्याय करण्याचा एक षडयंत्र तरी नसावा असा शोध घेतला आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मुस्लिमांना न्याय देणारे उद्योजक निर्माण करणारे शैक्षणिक आर्थिक योजना राबवणारे एवढे मोठी महामंडळ एका गल्लीच्या कानाकोपऱ्यात आढळून आल्याने (भाजपा जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष) मोहम्मद आतिक यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना खुले आव्हान केले अल्पसंख्यांक मतदारांच्या भरोशावर आपण निवडणूक लढवता निवडून येता आणि भाजपा जातिवादी पार्टी आहे असे जनसामान्यांत दर्शवता मुळीच भाजपा ही जातिवादी पार्टी नसून प्रत्येक जाती धर्मासाठी कार्य करणारी एकमेव राष्ट्रीय पार्टी ठरत आहे अशातच अशा महामंडळाच्या दुरवस्थेमुळे महा विकास आघाडी यांची अल्पसंख्यांक बांधवां विषयी मानसिकता कशा पद्धतीची षड्यंत्राची आहे हे लक्षात येते अनेक वर्षापासून हे महामंडळ पुनर्गठित केले नाही, थेट कर्जाचे वाटप नाही, शैक्षणिक आर्थिक कर्ज वाटप अल्पदरात असून जनजागृती नाही या महामंडळाचा प्रचार-प्रसार नाही योजनेविषयी मुस्लिम बांधवांच्या पर्यंत हा विषय पोहोचवल्या जात नाही यामुळे अनेक समस्या लक्षात येताच मोहम्मद आतीक महाराष्ट्रवालेंनी हा विषय हाती घेतला असून प्रथम मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ हे कार्यालय एका खाजगी घरात एका अज्ञात स्थळी गल्ली बोळात न ठेवता उद्योग भवन, सामाजिक न्याय विभाग किंवा इतर शासकीय कार्यालयात हलविण्यात यावे जेणेकरून ग्रामीण भागातून येणाऱ्या गोर गरीब व्यक्तीला हा सहज रित्या त्या कार्यालयात जाऊन न्याय मागता येईल आणि योजनेचा लाभ घेऊ शकतो अन्यथा हे कार्यालय माझ्यासारख्या जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या व्यक्तीला तीन तास कार्यालय शोधूनसुद्धा कठीण परिस्थितीत सापडले मग ग्रामीण भागातून येणाऱ्या जनसामान्य व्यक्तींना हे कार्यालय सापडेल तरी कसे म्हणून हे कार्यालय शहराच्या शासकीय इमारतीत जर असेल तर सहज रित्या ग्रामीण भागातील व्यक्ती कार्यालयात येऊन या योजनेचा या महामंडळाचा लाभ घेऊ शकतो यासाठी मोहंमद आतिक महाराष्ट्रवाले यांनी येणाऱ्या 30 दिवसात जर हे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कार्यालय शासकीय इमारतीत स्थलांतरित केले नाही तर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला तसेच महा विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक हे एका अल्पसंख्यांक जातीचे असून सुद्धा त्यांनी या विषयाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले याचा सुद्धा मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळात या महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्याक बांधावर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे सुद्धा यावेळी मोहम्मद आतिक (भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ) यांनी ग्वाही दिली आहे यावेळी या पत्रकार परिषदेला भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र आरगडे, शहराध्यक्ष संदीप झाडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद बनगीनवार, महादेव सुपारे जिल्हा उपाध्यक्ष, कल्पना पवार सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी कामगार आघाडी , अनिल भरारे,अमित शाह, स्वप्नील दुधे, अल्पसंख्यांक मोर्चा आघाडीचे अब्दुल गफ्फार आ. सत्तार तालुका अध्यक्ष,
आसिफ मुस्तफा शेख बंगाली शहर अध्यक्ष,
अब्दुल गफ्फार अब्दुल रशीद तालुका महामंत्री,
मुज्जू गौरव तालुका सर चिटनिस,
शेख मोहसिन शेख फहीम सचिव सह उपस्थित होते

Copyright ©