Breaking News यवतमाळ

गेल्या 24 तासात 7 कोरोनामुक्त ; 2 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1867- बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 5 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2 जण पॉझेटिव्ह तर 7 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आजज एकूण 250 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 2 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 248 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 30 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72746 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70930 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये महागाव येथील दोनन रूग्णांचा समावेश असून एक पुरुष तर एक महिला आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 82 हजार 916 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 10 हजार 113 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.65 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.80 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1867 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 38 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1867 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 23 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 614 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 14 रुग्णांसाठी उपयोगात तरर 622 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©