Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या २४ तासात १५ कोरोनामुक्त ; ७ पॉझेटिव्ह शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1862- बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 4 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 7 जण पॉझेटिव्ह तर 15 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 602 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 7 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 595 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 35 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72744 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70923 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये महागाव येथील एक, नेर एक, पुसद चार व इतर शहरातील एका रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 82 हजार 648 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 9 हजार 864 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.66 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.16 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1862 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 43 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1862 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 28 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 609 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 14 रुग्णांसाठी उपयोगात तर 622 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

____________________________________

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

– यावर्षी दहावी च्या निकाला आधीच प्रवेश नोंदणी सुरु

– प्रवेशाकरिता कुठलीही सीईटी नाही

– प्रवेश अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत

– नोंदणी करतांना मार्कशीट/टी.सी.ची गरज नाही.

– स्थापत्य, संगणक, विद्युत, अणुविद्युत व यंत्र अभियांत्रिकी अभ्यासक्रम उपलब्ध

– प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ६० जागा प्रवेश क्षमता

यवतमाळ दि.4 जुलै : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता होणाऱ्या पॉलीटेक्नीक प्रवेश प्रकियेसाठी गव्हर्नमेट पॉलीटेक्नीक, यवतमाळ, येथे नोडल ऑफिसर प्राचार्य डॉ. डी. एन. शिंगाडे यांचे देखरेखीखाली प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी सुविधा केंद्र सुरु झाले असून दहावी चे शिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता ३० जून ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेश प्रकिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात दहावी नंतरचे पदविका अभ्यासकम सुरु असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ, व सुशगंगा तंत्रनिकेतन,वणी या दोन संस्था कार्यरत आहेत.

प्रवेश प्रक्रिया :
विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. ऑनलाईन पध्दतीमध्ये इ-स्क्रुटीनिटी व फिजीकल स्क्रुटीनिटी असे दोन पर्याय आहेत. कोविड-१९ प्रादुर्भाव पसरू नये म्हणून सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थी व पालकाची होणारी गर्दी टाळणे यासाठी इ-स्क्रुटीनिटी या पर्यायाची निवड करावी. फिजीकल स्क्रुटीनिटी या पर्यायामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरुन त्याची प्रिंट व आवश्यक मुळ कागदपत्रासह सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.

शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ येथे एकूण ३०० प्रवेश क्षमतेसह स्थापत्य अभियांत्रिकी (Civil), संगणक (Computer), विद्युत (Electrical), अणुविद्युत (Electronics and Tele-Communication) व यंत्र अभियांत्रिकी (Mechanical) या प्रत्येक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी ६० प्रवेश क्षमता / जागा उपलब्ध आहेत.

प्रवेशाचे ठळक वैशिष्टये : प्रवेशाकरिता कुठलीही सीईटी नाही, नोंदणी करतांना मार्कशीट/टी.सी.ची गरज नाही. वर्ग १० वी च्या परीक्षेचा आसन कमांक/ सीट नंबर द्वारे अर्ज करण्याची सुविधा), जात प्रवर्गाचे कुठलेही कागदपत्र नसतांना ओपन मधून अर्ज करण्याची मुभा व जाती प्रवर्गाचे कागदपत्र मिळाल्यानंतर अर्ज मुळ जाती प्रवर्गामध्ये बदलण्याची मुभा. नोंदणी करतांना शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ येथे मोफत समुपदेशन केंद्र व सुविधा केंद्र. प्रथम वर्ष प्रवेशाची नोंदणी करण्याकरीता सुट्टीच्या दिवसासह सर्व दिवशी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत प्रवेशाची कार्यवाही सुरु राहील. प्रवेश नोंदणी फी खुल्या प्रवर्गासाठी रु. ४०० व मागास प्रवर्गासाठी रु. ३०० ऑनलाईन भरता येईल.

प्रवेश प्रकिया समन्वयक म्हणुन प्रा. केशव बेले (9511726568) काम पहात असुन अधिक माहितीठी https://poly21.dtemaharashtra.gov.in/diploma21/ या संकेतस्थळावर किंवा प्रा. पी.जे. सब्बनवार (9823664631) यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सुविधा केंद्रामध्ये जमा करुन याचा लाभ घ्यावा तसेच प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थी/पालक यांना काही शंका / अडचणी असल्यास प्राचार्य, डॉ.डी.एन.शिंगाडे (7387617537) यांचेशी संपर्क करावा, असे आव्हान डॉ.डी.एन.शिंगाडे यांनी केले आहे.

Copyright ©