यवतमाळ सामाजिक

शिवसेनेकडून सव्वालाखे ले अाऊट भोसा प्रभाग क्र.२० मध्ये वृक्षारोपण

——————————————–
जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांच्या हस्ते वृक्षारोपण 
——————————————–
नंदाताई भिवगडे यांचा पुढाकार! 
——————————————–
यवतमाळ-: कोरोना काळात रुग्णांना व सर्वसामान्य जनतेस अनेक अडचणी निर्माण झाल्या असून त्यांना एक धीर देत या संकटाला कसे तोंड देता येईल व त्यांच्या कोणत्या समस्या आहेत त्या कश्या सोडविता येईल. ही सामाजिक बांधिलकी जोपासत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या नंदाताई मनोज भिवगडे यांनी शिवसेना यवतमाळ जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांना आपल्या वार्डात बोलावून नागरिकांच्या समस्या त्यांच्या पुढे ठेवून त्या समस्या सोडविण्यासाठी विनंती केली. सोबतच कोरोना काळात ऑक्सीजन अभावी अनेक रुग्णांचे जिव गेले. या दृष्टीने वातावरणात ऑक्सीजनचा समतोल रहावा. दिवसेंदिवस वातावरणात अनेक बदलाव होवून अनेक चमत्कार साक्षात पहावयास मिळत असल्याने वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही म्हण पुढे करीत पिंगळे यांच्या हस्ते कोरोनाचे सर्व निर्बंधांचे पालन करून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वार्डातील अनेक नागरिकांनी नंदाताई भिवगडे यांच्या निवासस्थानी जाऊन आपापल्या समस्या माडल्या त्या जाणून घेवून शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत त्या आपण पुरेपूर सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी वार्डातील मनोज भिवगडे, सलाउद्दिन खान, कादरभाई, सादिक सर, विजय डांगे, शंकर बोरपे, किशोर भिवगडे, राजू चव्हाण, अनिल येसने, कलीम भाई, इकबाल भाई, अर्पित उघडे, अभी वाटगुरे, प्रमोद भिवगडे, विक्की देठे, रेहान सिद्दीकी तुषार कैथवास, रामराव पगे, जिजाबाई उघडे, गंगाबाई गायकवाड, मंगेश फटींग, बाबा भाई, हाफी साहब, मंदा दिघेकर, माया हुरकुडे, निषार बेग, दिनेश भिवगडे, राहुल गंभीरे यांचे सह बहुसंख्य महिला पुरुष युवकांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी नंदाताई भिवगडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Copyright ©