Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 5 कोरोनामुक्त ; 3 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1866 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 3 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 3 जण पॉझेटिव्ह तर 5 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 548 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 3 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 545 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 43 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72727 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70908 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये महागाव येथील एक, यवतमाळ एक व बाहेर जिल्ह्यातील एका रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 82 हजार 162 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 9 हजार 269 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.66 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.55 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1866 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 39 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1866 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 29 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 608 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 9 रुग्णांसाठी उपयोगात तर 627 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©