यवतमाळ सामाजिक

गुरुदेव नगर येथे दूषित पाणी पुरवठा, गडूळ व दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 

संपूर्ण शहरात नगर परिषद कडून होणारा पाणी पुरवठा आधीच पाच दिवसा आड होत असतो ते पण एक तासभरा साठीच पाणी सोडल्या जाते.त्या सह शहरात कित्येक जागी पाईपलाईन लिकेज दिसून येते अशातच शहरातील गुरुदेव नगर मध्ये गडुळ व दुर्घन्दी युक्त पाणी पुरवठा होत असल्याने गुरुदेव नगर वाशीयांमध्ये या गडुळ व दुर्घन्दी युक्त पाणी प्यायल्याने आरोग्या विषयी भीती निर्माण झाली असून उलट्या,जुलाब,अतिसार,कॉलरा, हगवन,टायफाईड व काविळ या आजाराणा सामोरे जावे लागत आहे दूषित पाण्यामुळे नागरिकात चिंतेचे वातावरण पसरले आहे .अनेक तक्रारी देऊन सुध्दा नगर पालिका प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे

गुरुदेव नगर येथील गावंडे यांच्या घराजवळील पाईप लाईन लिकेज होती ती आठ दिवसा पूर्वीच दुरुस्त केली आहे.अजून कुठे लिकेज असेल त्याचा शोध घेणे सुरू आहे लवकरच शोध घेऊन दुरुस्त करण्यात येईल व शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल

पाणी पुरवठा अधिकारी
गौरव मांडले

Copyright ©