यवतमाळ सामाजिक

अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना निरोप समारंभ.

 

दि. २-७-२०२१ रोजी जवळा येथे सावित्रीबाई फुले मंगलकार्याल येथे सौ बेबीताई सुधाकरराव मंगाम (पर्यवेक्षिका प्रकल्प आर्णी) यांच्या निरोप समारंभ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रम मध्ये सर्व अंगणवाडी सेविकांनी व कर्मचाऱ्यांनी बेबीताई मंगाम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व तसेच श्री विलास अगलदरे पंचायत समिती सभापती आर्णी व जवळा गावातील सरपंच आडे ताई व उपसरपंच श्री बाबाराव खोडणकर जवळा येथील ग्रामपंचायत सदस्य आदींनी सुध्दा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आणि लोणी सर्कल व मसोला सर्कल मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस सुध्दा हजर होत्या सर्वांनी मंगाम मँडम यांना मिळुन काही भेट वस्तू दिल्या व यावेळी अंगणवाडी सेविका निरोप समारंभ च्या कार्यक्रमात बोलताना मंगाम मॅडम यांच्या सहवसातील २८ वर्ष असे आनंदात गेले ते माहीत पडले नाही असे बोलताना पर्यवेक्षिका चद्रंकला गजभीये ताई यांचे अश्रू अनावर झाले व सर्व अंगणवाडी सेविकाच्याही अक्षरशः डोळ्यात अश्रू वाहत होते या कार्यक्रमाला आर्णी पंचायत समिती सभापती विलासभाऊ अगलधरे ,सरपंच प्रणिता आडे, उपसरपंच बाबाराव खोडकर,प्रकल्प येथील यादव बाबु व तसेच ग्रामपंचायत सदस्य लताबाई रामटेके जवळा येथील सर्व आशा सेविका हजर होते.

Copyright ©