महाराष्ट्र सामाजिक

स्वर्गीय पि एल शिरसाट यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय स्वर्गीय पि एल शिरसाट यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली अकोला महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना, निर्भय बनो जनआंदोलन, सेवाश्री बहुउद्देशीय संस्था, विविध सामाजिक संस्था संघटनेच्यावतीने ग्रामीण पत्रकारांची ढाल पत्रकारांसाठी शेवटच्या रक्ता चा थेंब असेपर्यंत पर्यंत लढा देणारे लढवय्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक, स्वर्गीय पी एल शिरसाट यांच्या जयंतीनिमित्त दोन जुलै वार शुक्रवार ला केंद्रीय कार्यालय आनंद नगर खदान अकोला येथे त्यांना विविध सामाजिक संस्था संघटनेच्यावतीने वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार पी एन बोळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याध्यक्ष चंदाताई शिरसाट, राज्य कोषाध्यक्ष गजाननरावजी हरणे, अकोला जिल्हा अध्यक्ष विलास नसले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वा आभार प्रदर्शन कुमारी प्राची शिरसाट यांनी केले यावेळी ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्ह्यातील अनेक पत्रकार बंधु उपस्थित राहून पि यल शिरसाट यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यात आली यावेळी ग्रामीण पत्रकार संघटनेचे तसेच विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Copyright ©