Breaking News यवतमाळ सामाजिक

महामार्गावर बस व आयसर ची धडक.

 

अपघातात बस चालक गंभीर तर तीन जण जखमी.

आर्णी तालुक्यातील जवळा लगतच्या केंद्रीय महामार्गावर बस व आयसर ची समोरासमोर धडक झाली सुदैवाने जीवितहानी टळली.
शनिवार ला सकाळी ९:३० च्या दरम्यान दारव्हा वरून जवळा मार्गे आर्णी जाणारी एम एच ४० एन ८०७८ ही बस जवळा बस स्टॉप वर प्रवासी चढ-उतर करून आर्णी मार्गे निघाली मात्र दारव्हा फाटा व जवळा जिनिंग जवळ सर्विस रोड वरून महामार्गावर जाण्यास रस्ता दुभाजक नसल्याने बस चालकाला विरुद्ध दिशेने घ्यावी लागते जवळ्याच्या समोर एक किमी अंतरावर किनी फाट्या जवळ रस्ता दुभाजक असल्याने बस चालक बस वळवीत असताना अचानक आर्णी कडून यवतमाळकडे एम एच ४५ ए. फ. ४२७३ क्रमांकाचा डाळिंबाने भरलेला आयसर सुसाट वेगात असून चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला समोरासमोर धडक दिली यात बस चालक रमेश रामचंद्र बुचके वय ५० राहणार पाभळ हा गंभीर जखमी झाला असून बसमधील २१ प्रवाशांपैकी तीन प्रवाशांना सुद्धा मार लागला आहे अजित महादेव बानारे वय ३२ राहणार गावठाण कदमवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली असे आयसर चालकांचे नाव आहे तो डाळिंबाचा माल सांगली वरून नागपूर ला घेऊन जात होता घटनास्थळावरून मनसेचे तालुका अध्यक्ष सचिन येलगंधेवार यांनी ॲम्बुलन्स ला बोलावून जवळा गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे पाठविले व आर्णी पोलिसांना माहिती दिली पुढील तपास एपीआय शिवराज पवार, ए एस आय मनोहर पवार, जमादार अरुण चव्हाण करीत आहे.

Copyright ©