यवतमाळ सामाजिक

अंगणवाडी मदतनीस यांचा पहिला सन्मान.

बाल विकास सेवा योजना कळंब तालुका प्रकल्प अधिकारी मा. डॉ. प्रशांत विधाते व कर्मचारी वर्ग यांनी अंगणवाडी मदतनिस श्रीमती शोभाबाई देविदासजी माहुलकर यांचा भावपूर्ण सत्कार केला. कळंब बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी कार्यालयाने मदतनिस यांचा सेवा निवृत्ती निमित्य केलेला पहिला सत्कार ठरला आहे.
याप्रसंगी बाल संरक्षण समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री अशोकभाऊ उमरतकर, सामाजिक कार्यकर्ते व हिरवाईचे गाव उपक्रमाचे निमंत्रक बसवेश्वर माहुलकर, विश्वंभर माहुलकर, अधीक्षक मुसळे साहेब,
श्रीमती शीला मानकर, श्रीमती वंदना नानोटे, श्रीमती पपीता खेडकर सर्व पर्यवेक्षीका तसेच
अभिषेक सितेवार क. सहाय्यक आदी उपस्थित होते!

Copyright ©