यवतमाळ सामाजिक

आॅल इंडिया जमीयतुल कुरैश च्या तालुका अध्यक्ष पदी कज्जुम कुरेशी यांची निवड

 

घाटंजी महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया जमियतुल कुरेश या सामाजिक संस्थेमार्फत एका बैठकीत शेख कज्जूम कुरेशी ऑल इंडिया जमियतुल कुरेश या सामाजिक संस्थेच्या घाटंजी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तालुक्यात सामाजिक क्षेत्रात वेळोवेळी अव्वल स्थानावर राहणारे कोरोना महामारीच्या काळात आपली सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात देऊन आपली जबाबदारी पार पाडणारे विविध क्षेत्रातील आपली भूमिका बजावत असतात.ऑल इंडिया जमियतुल कुरेश संस्थेच्या समाजातील एक कुशल नेतृत्व सामाजिक बांधिलकी तसेच अनेक पद त्यांनी भूषविले आहे.पत्रकारिता, सामाजिक,राजकीय ,संघटन कौशल्य अश्या अनेक बाबीचा विचार करून त्यांची निवड करण्यात आली आहे .त्यांच्या या निवडीमुळे समाजातील व इतर घाटंजी वासीयांना कडून त्यांचा सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नियुक्ती पत्र देते वेळी शेख.शफी कुरेशी,हाफीज कुरेशी,मतीन कुरेशी, सैय्यद नमीश उपस्थित होते कज्जुम कुरेशी यांनी जमीअतुल कुरेश चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अलहज मोहम्मद अयुब अलहज मोहम्मद महेमुद साहेब कुरेशी व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अब्दुल हनीफ अब्दुल गफार कुरेशी यांचे आभार मानले.

Copyright ©