यवतमाळ सामाजिक

स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त भांबोरा येथे सेनीटायझर व मास्क चे वाटप

———————————————
घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथे महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या १०८ व्या जयंतीचे औचित्य साधून भांबोरा येथीलच कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते असे पोलीस विभागात काटोल येथे पी. एस. आय. पदावर कार्यरत असणारे जयसिंग पवार यांच्या तर्फे गावकऱ्यांना सेनिटायजर व मास्क चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व प्रथम स्व. वसंतराव नाईक साहेबांच्या जयंती पार पडली यावेळी भांबोरा ग्राम पंचायतचे सरपंच कुणाल राठोड, उपसरपंच जितू राठोड यांचे सह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. गावकऱ्यांनी जयसिंग पवार यांचे आभार व्यक्त केले.

Copyright ©