यवतमाळ सामाजिक

पावसांनी दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

 

मृग नक्षत्राच्या सुरुवाती पासून सतत कोसळणाऱ्या पावसाने मागील 5 ते 6 दिवसापासून विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे . जर येता दोन ते तीन दिवसामध्ये पाऊस पडला नाही तर कदाचित सोयाबिन आणखी उशिरा पेरलेल्या कपाशी पिकांचे मोठे नुकसान होणारं असून काही शेतकऱ्यांवर दुप्पट पेरणीचे संकट सुद्धा कोसळणाऱ्याची चिन्हे आहेत .
यावर्षी पाऊस सरासरी एवढा पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता . त्यानुसार सुरुवातीलाच मृग नक्षत्र सुरु झाल्यानंतर पावसाळा सुरुवात झाली. जवळपास पंधरा दिवस पाऊस चांगला पडला . शेतकरीही आनंदी झालेत . सर्वांची पेरणी झाली . अनेकांची पिके बहरली सुध्दा . काहींनी तर डवरणे आटोपलीत आणि पुन्हा पाऊस येईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी तरळायला लागले . चांगली बसलेली शेती मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर असून जर पुढील तीन ते चार दिवसामध्ये पाऊस पडला नाही तर अनेक शेतकऱ्यांवर परत पेरणीचे संकट कोसळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

येरे येरे पावसा
म्हणायची वेळ आली
आधीच दुष्काळपरस्थिती मुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी महागाईच्या तडक्यातही सोसावा लागत आहे . आधीच उत्पन्न कमी त्यातच महागाईच झळ , वाढलेले बियाणे व खतांचे भाव आणि याही परिस्थितीमध्ये नगदी घ्यावे लागेलेले शेती बियाणे व खते. एवढे करून जर शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजनच कोसळू शकते. येरे येरे पावसा करत दिवसभर आशाळभूत नजरेने आकाशाकडे डोळे लावून बसणऱ्या शेतकऱ्यांचा डोळ्यामध्ये पाऊसाची काही चिन्हे दिसत नसल्याने डोळ्यातून अश्रू ओघळण्याची वेळ आलेली आहे . वरुणराजाच्या कृपेने पावसाला सुरुवात व्हावी . अशी आशा करण्याऱ्या शेतकऱ्याच्या नशिबी निराशा पडते कीं काय असे वाटायला लागले आहे .

Copyright ©