यवतमाळ सामाजिक

माजी मंत्री आ. संजय राठोड यांचा विविध उपक्रमांनी घाटंजीत वाढदिवस साजरा.

———————————————-
युवा सेनेचा पुढाकार
———————————————-
घाटंजी: महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार लोकनायक संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त घाटंजी येथील शिवसेना-युवासेना पदाधिकारी यांच्या वतीने कोरोना काळातील सर्व नियम पाळत अगदी साध्या पद्धतीने विविध सामजिक उपक्रमांचे आयोजन करून शिवसैनिकांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
आपल्या नेत्याप्रती आदर जोपासत युवासेना उपजिल्हा प्रमुख आकाश राठोड व घाटंजी तालुक्यातील शिवसैनिकांनी कोरोनाचे सर्व निर्बंध बाळगून पंचायत समिती ला सपभाती निताताई आकाश जाधव, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, पशुसंवर्धन अधिकारी गोपलसिह ठाकूर तर पोलीस स्टेशन ला पोलीस निरीक्षक बबन कऱ्हाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना काळात गरजेची समजली जाणारी सेनीटायझर मशीन भेट देण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करून माजी मंत्री आमदार संजय राठोड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनाचे सर्व निर्बंध लक्षात घेऊन आर्णी विधानसभा युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख आकाश राठोड यांनी या सर्व उपक्रमाचे आयोजन करून प्रमुख भुमिका बजावली. यात शिवसेनेचे घाटंजी तालुका प्रमुख निलेश चव्हाण, शहर प्रमुख मनोज ढगले, भोपिदास राठोड, भावना राऊत, ज्योतीताई वाघाडे, प्रशांत मस्के, विकास नैताम, मुकुंदा बुरकुंडे, संतोष धेनावत, राहुल आडे, रोशन आडे, जिया चौरीवार, नुसरत खान, सागर खडसे, शुभम विरदनडे, सतिष पेटकुले, मंगेश ठमके, विक्रम अन्नमवार, भाऊ कूमरे, प्रतिक ढोके, दिनेश जाधव, वासुदेव राठोड, तुषार राठोड, जितेश राठोड, अभय राठोड, संतोष गायकवाड, खुशाल पवार, किसन जाधव, प्रशील ढोके इत्यादी शिवसैनिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते असे युवासेना उपजिल्हाप्रमुख आकाश राठोड यांनी प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे.

Copyright ©