यवतमाळ सामाजिक

सहाय्यक ग. वि. अ. रणमले यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा

———————————————-
घाटंजी- पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी तथा विस्तार अधिकारी (पंचायत) पि. डी. रणमले यांचा वाढदिवस कृषी दिनी आल्याने या शुभ दिनाचे औचित्य साधून केक न कापता पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
पंचायत समिती मध्ये कार्यरत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असलेले पि. डी. रणमले यांचा वाढदिवस १ जुलै या कृषी दिनी आला असता त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस कोरोनाचे निर्बंध लक्षात घेऊन केक न कापण्याचे ठरवून वृक्षारोपण करण्याचे ठरवित पंचायत समिती परिसरात वड व पिंपळाचे वृक्षाचे लागवड करण्यात आले. यात कृषी दिनाचे उदिष्ट ही सफल करून एक चांगला संदेश जनतेत पोहचविला. या कृषी दिनी घाटंजी पंचायत समिती मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी अधिकारी लक्ष्मण लखमोडे, विस्तार अधिकारी विश्राम वाडगे, लेखापाल नेहा जयस्वाल, राहुल खोब्रागडे, रुपाली राऊत, मूनेश्र्वर मॅडम, जाधव यांचे सह कर्मचारी व अधिकारी हजर होते.

Copyright ©