यवतमाळ सामाजिक

दुध दर वाढीसाठी दिले पालक मंत्र्यांना निवेदन पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले दुधाचे भाव जैसे थे

मदर डेअरि संचालक रेहकी (सु.)–प्रशांत लाडे

तालुक्यातील सर्व डेअरि संचालक व दुध उत्पादकानकडून दुधाच्या दारात वाढ होण्यासाठी पशुसवर्धंन तथा दुग्ध विकास मंत्री तसेच वर्धा जिल्याचे पालकमंत्रि सुनिलजी केदार यांच्या स्वीय सहायकाकडे निवेदन देण्यात आले.
3.0फैट व 8.0ऐस ऐन एफ च्या गुणवत्तेच्या दुधाला कमीत कमी 25 रुपैऐ भाव डेअरि संस्थांकडून मिळण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली तसेच पशुखाद्याचे भाव कमी करण्यात यावे.अशी सुधा मागणी निवेदनतून देण्यात आली आहे.
दुग्ध व्यवसाय हा शेतिपूरक म्हणून पारंपरिक पधतिने अनेक वर्षापासून केला जातो व शेतीला जोड धंदा मानल्या जातो मात्र मागिल काही वर्षापासून दुधाला भाव नसल्या कारणानी दुध व्यवसाय न परवडणारा झालेला आहे.
या वेळी राजेश झाडे,प्रशांत लाडे,सचिन चावरे,प्रफुल धानकुटे,सचिन झाडे,श्याम घुमडे,मयुर झाडे,आशिष झाडे व अनेक उत्पादक व संचालक उपस्तीत होते.
जेव्हा दुधाचे भाव स्थिर होते तेव्हा मी माज्या गावात 700लिटर दुध संकलन करुन मदर डेअरि ला देत होतो दुधाचे दर पडल्यामुळे आता फक्त 400लिटर दूधाच संकलन मज्या कडे आहे परवडत नसल्यामुळे गोपा लकानी दुधाळ जनावरे विक्रीस काढले आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©