यवतमाळ सामाजिक

आर्णी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी शेषराव टाले यांची नियुक्ती

आर्णी येथे न.प.च्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारणारे शेषराव टाले हे दिग्रस येथे अं गेल्या ७ वर्षा पासून सर्वांना सोबत घेऊन कार्यरत होते.नुकतेच यवतमाळ येथे ४ दिवसा करिता मुख्याधिकारी पदाचा कार्यभार शेषरावजी टाले यांनी सांभाळल्या चे राजकीय क्षेत्रातील लोकांन कडून चर्चिल्या जात आहे.एक दांडगा अनुभव प्राप्त वैक्ती आर्णी नगर परिषद मुख्याधिकारी पदावर विराजमान होत असल्याने आर्णी शहराच्या विकास कामांना वेग येईल अशी नागरिकात चर्चा आहे.आज त्यांनी पदभार स्विकारला त्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतांना बांधकाम सभापती लक्ष्मणराव पठाडे, सेवानिवृत न प कर्मचारी सुधाकरजी चित्तेकर,सामाजिक कार्यकर्ते संजय जी व्यवहारे, फयाज सय्यद, हे उपस्थित होते

आर्णी शहरातील स्मशान भुमीसाठी शवदाहिनी डंपिंग ग्राउंड,व
अनेक विकासकामा बाबत बांधकाम सभापती लक्ष्मणजी पठाडे सोबत चर्चा केली व विकासकामांना प्राधान्य देवु याची ग्वाही दिली

Copyright ©