यवतमाळ सामाजिक

देशाला आज शाहू महाराजांच्या विचारांची गरज :- सरपंच पुरुषोत्तम कुडवे

आरक्षणाचे जनक, कोल्हापूर संस्थानचे राजे ,गोरगरीब, वंचितांचे ,न्यायदाता राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती नुकतीच ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक मराठी शाळा झिरपुरवाडी येथे उत्साहात संपन्न करण्यात आली.यावेळी सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की, आज देशाला शाहू महाराजांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. यावेळी सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांच्या शुभहस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत यांच्या वतीने शाहू राजेंना अभिवादन करण्यात आले. या जयंती कार्यक्रमास अध्यक्ष सरपंच पुरुषोत्तम कुडवे, नामदेव पवार अध्यक्ष तंटामुक्ती, सदस्य सुनील भस्मे, अध्यक्ष शुभाष पवार,माजी सरपंच शंकर जुडे, विलास डहाणे, रमेश शेळके दिलीप पवार,किसन भस्मे, हिम्मत अंभोरे पोलीस पाटील मिराशे, भिमराव डहाणे, मुख्याध्यापक गजानन खरबडे, शिक्षिका अनिता गझलकर,सुनिता शिकारे, मंगला डहाणे शिपाई अशोक मिराशे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन खरबडे तर आभार प्रदर्शन अनिता गझलकर यांनी व्यक्त केले.

Copyright ©