यवतमाळ सामाजिक

सोयाबिन पिक उत्पादन वाढीसाठी अष्टसूत्रीचा अवलंब करावा

 

कपाशीचे क्षेत्र घटून सोयाबिचे क्षेत्र वाढले

खरिपाची 2000 हेक्टर वर बीबीएफ पध्दतीने लागवड

कृषी संजिवनी मोहीमे मध्ये शेतकऱ्यांकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन

दिग्रस, दि. 27 जून : सध्या स्थितीत दिग्रस तालुक्यात 242 मी.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील मुख्य पिकांची 95 % पेरणी पूर्ण झाली आहे. मागिल वर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटून सोयाबिनचे + तूरीचे क्षेत्र 5500 हेक्टरने वाढले आहे.
कृषी तंत्रज्ञानामधील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करु शकते हे जाणून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी दिग्रस तालुक्या मध्ये 21 जुन पासून कृषी संजिवनी मोहीम राबविण्यात येत आहे. यात कृषी विभाग व आत्माचे अधिकारी, कर्मचारी, कृषि शास्त्रज्ञ गावनिहाय सभा, शिवार फेरी, शेतीशाळा व चर्चा सत्राच्या माध्यमातून कृषी अधिकारी एस.एस. राजपूत व ए.डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सोबत संवाद साधत आहेत.

सध्या सोयाबीन हे मुख्य पीक असल्याने पिकाचे व्यवस्थापन गरजेचे आहे. या करीता कृषि विभागाने सुचविलेल्या सोयाबिन अष्टसूत्री चा अवलंब करावा.

1.संतुलित खत व्यवस्थापन करतांना शिफारशी नुसार वखताची मात्रा योग्य वेळेतच द्यावी. S.S.P. वापरले तर कमी खर्चात पिकाला आवश्यक ते अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. पेरणी नंतर सोयाबिन पिकास युरिया खताची दुसरी मात्रा देऊ नये.

2. पेरणी नंतर तणनियंत्रण करीता 15 ते 20 दिवसात तन 2 ते 3 पानांवर असतांना इमॅजिथायपर किंवा क्विझालोपॉप 5 % इसी 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यात फवारावी. फवारणी करतांना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.

3. अधिक उत्पादन मिळविण्या करिता शिफारस केलेल्या खत मात्रे सोबत पेरणीच्या 50 – 70 दिवसांनी 200 ग्रॅम युरिया 10 लिटर पाण्यात विरघळून फवारणी करावी.

4. कीडनियंत्रणासाठी 25 दिवसांत निंबोळी अर्काची फवारणी करावी.

5. पीक 27 दिवसांचे असतांना खोडमाशीच्या प्रतिबंधासाठी थायमेथॉक्झाम + लॅम्बडासीहालोथ्रिन (9.5%) झेडसी
मिलि प्रति 10 लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

6. आंतरपिके पिक पध्दती, एकाच वेळी पेरणी करणे, रासायनिक व कीटकनाशकांचा समतोल वापर, परोपजीवी कीटक, कामगंध / प्रकाश सापळा वापरणे, शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे, रोग- कीडग्रस्त झाडे नष्ट करणे ई गोष्टी सोयाबीन पिक उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या ठरणार आहे. असे तालुका कृषी अधिकारी दिग्रस यांनी कळविले आहे.

पेरणी अहवाल
तालुक्यातील मुख्य पिक पेरा क्षेत्र (हेक्टर)
सोयाबिन – 17862
कपाशी – 13490
तूर – 3732
मूग / उदीड- 690
ऊस – 358
हळद – 412
भाजीपाला – 226
ईतर – 950

—————————–
एकूण – 37188 हेक्टर

Copyright ©