यवतमाळ राजकीय सामाजिक

विविध उपक्रमांनी संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवस साजरा

 

 

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शिवसेना नेते आमदार संजय भाऊ राठोड यांचा वाढदिवस दिनांक 30 जूनला आहे. त्यानिमित्ताने जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. यालाच अनुसरून राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे भव्य नेत्रतपासणी शिबिर तालुका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आले. यात 150 लोकांनी नेत्रतपासणी चा लाभ घेतला. तर 50 च्यावर नेत्र रुग्णांना मोफत नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. सोबतच निराधार माता-भगिनींना साडीचोळी वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते मनोज भोयर, सुरेश मेश्राम माजी प. स. उप सभापती , तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुडे, सौ. पार्वताताई मुखरे, प्रितीताई भगत हे होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील सावरकर, रिंकू हीकरे, राजू देवकर, दिवाकर जवादे, निशिकांत पोंगडे, किशोर वाघ, महादेवराव मुखरे, नितीन येवले, धर्मेंद्र भगत, सतीश नगराळे, लखन पांडे, दीपक खडसे, अंकुश डोळस, गौरव महाजन, अंकित मोकासे, यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Copyright ©